माफी गुन्हेगाराला दिली जाते : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नागपूर : आम्ही सरसकट कर्जमुक्तीची मागणी केली आहे. कर्जमाफी म्हणू नका, कारण माफी ही गुन्हेगाराला दिली जाते आणि शेतकरी गुन्हेगार नाहीत. त्यामुळे कर्जमुक्ती म्हणा, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे येथे पत्रकारांना एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आज ते नागपुरात आले होते. "आपण निवडणूक लढणार का?' या प्रश्‍नाच्या उत्तरात "हा पेपर मी आत्ता फोडणार नाही', असेही ते म्हणाले.

2007 मध्ये शिवसेनेच्या मागणीनंतर महाराष्ट्रात कर्जमुक्ती झाली होती, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चामुळेच 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी रुपये मिळाले. आम्ही सरसकट कर्जमुक्ती मागतोय आणि आमच्या रेट्यामुळे राज्यात संपूर्ण कर्जमुक्ती होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे सांगून या विषयावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. महाराष्ट्र म्हणून आपण पुढे जात आहोत. प्रदुषणमुक्त, बेरोजगारीमुक्त आणि कर्जमुक्त महाराष्ट्र बनवायचा आहे. त्यासाठी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील प्रश्‍न हुडकून काढून ते सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे आदित्य म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya thakre in nagpur