शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

दारव्हा (जि. यवतमाळ) : खरा देव जनता जनार्दन आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, मतदारांचे आभार मानण्यासाठी तर विरोधकांची मनं जिंकण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलो आहो. आपल्या साथीने दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवायचा असल्याचे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील शिवाजी स्टेडियमवर बुधवारी (ता.28) आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्यासह दिग्रस-दारव्हा मतदारसंघातील सेनेचे नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला ठिकठिकाणी लोकं भेटतात, सूचना देतात, निवेदने देतात. यानिमित्त मला प्रेम व जनआशीर्वाद मिळत आहे. जनआशीर्वाद यात्रा कोणाला मुख्यमंत्री बनविण्यासाठी, सत्ता मिळविण्यासाठी वा प्रचार करण्यासाठी नाही तर आमच्या पक्षाला लोकसभेत जनतेने भरभरून जी मते दिली त्यांचे आभार मानण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमुक्तीसंदर्भात ते म्हणाले, मला निवेदन द्या, कर्जमुक्ती होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. पीकविम्याच्या संदर्भात आम्ही दहा लाख शेतकऱ्यांना 960 कोटी रुपये वाटपासाठी कंपन्यांना बाध्य केल्याचे त्यांनी सांगितले.
दिग्रस मतदारसंघातून निवडणूक लढवा
आपण येणाऱ्या निवडणुकीत दारव्हा-दिग्रस-नेर मतदारसघांतून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहा. हा मतदारसंघ आपली वाट पाहतो आहे. फक्त फॉर्म भरण्यासाठी तुम्ही येथे या, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून मोठ्या फरकाने विजय मिळेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अशी भावनिक साथ महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आदित्य ठाकरे यांना घातली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya thakre in yavatmal