दिल्लीच्या मैदानावर अकोल्याच्या आदित्यची सप्तरंगी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

रणजी करंडकातील अकोलेकर क्रिकेटपटूने प्रथमच घेतले पाचपेक्षा अधिक बळी

अकोला : रणजी विजेत्या विदर्भ संघाचा उद्‍यनोमूख वेगवाग गोलंदाज आदित्य ठाकरेने दिल्लीच्या मैदानावर यजमान संघाविरुद्ध सप्तरंगी कामगिरी केली. त्याने दिल्लीच्या पहिल्या पाच फलंदाजांसह पहिल्या डावात एकूण सात गडी बाद केले. एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करणारा आदित्य पहिलाच अकोलेकर क्रिकेटपटू ठरला आहे.

अलीकडच्या काही वर्षांत अकोल्याच्या क्रिकेटपटूंनी विविध मैदाने गाजविली आहेत. त्यात आता वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेचाही समावेश झाला आहे. यावर्षी रणजी स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय गोलंदाज उमेश यादव आणि अनुभवी गुरबानीसारख्या प्रमुख गोलंदाजांच्या उपस्थित आदित्यने दिल्लीचे मैदान गाजवून संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील नवोदित वेगवान गोलंदाजांमध्ये आदित्यचे नाव आता घेतले जाऊ लागले आहे. नुकतेच सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीत अकोल्याच्या दर्शन नळकांडेने उल्लेखनीय कामगिरी केली होती. अर्थव तायडेने 23 वर्षांखालील विदर्भ संघाकडून खेळाताना खोऱ्याने धावा गोळा केल्या आहेत. त्यानंतर आता अकोल्याचाच नवोदित गोलंदाज आदित्य ठाकरेने रणजी करंडक स्पर्धेत देशाच्या राजधानीत सात गडी बाद करून क्रिकेट जगतात अकोल्याचा झेंडा उंचावला आहे. दिल्लीसारख्या बलाढ्य संघाच्या विरोधात त्याने केलेली कामगिरी भल्याभल्या गोलंदांना लाजविणारी ठरली. आतापर्यंत झालेल्या काही सामन्यांत आदित्यला प्रथम 11 मध्ये स्थान मिळू शकले नव्हते. मात्र जिद्दीच्या बळावर त्याने रणजी संघात पहिल्या 11 खेळाडूंमध्ये जागा मिळवली आणि मिळालेल्या संधीचे सोने करून दाखविले. दिल्लीच्या पहिल्या डावातील आदित्यच्या कामगिरीनंतर विदर्भ संघ या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यामुळे दुसरा डावात आदित्यच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहिल.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

दिल्लीचे हे फलंदाज ठरले आदित्यचे शिकार
दिल्लीकडून सलामीला आलेले के. चंदेला, एच.दलाल त्यानंतरचे आघाडीचे फलंदाज डी.आर.शोरे, एन. राणा, जॉन्टी सिधू, आय. शर्मा, आणि के. खेज्रोलीया हे सात फलंदाज आदित्यने बाद केले.

Image may contain: 1 person, playing a sport, baseball and outdoor

17 षटकातच मिळविले सात बळी
अकोल्याच्या आदित्यने पहिल्या डावात 17.1 षटके टाकली. यामध्ये त्याने तीन निर्धाव षटके टाकून 55 धावांत सात गडी बाद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya's brilliant performance on the field of Delhi