देवा, वरलीचा आकडा लागू दे, या जंगलात होते पूजा 

मोहन गायन 
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

याठिकाणचा बराच भाग जंगलाने व्यापला आहे. येथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची देवांवर आजही अफाट श्रद्धा आहे. मेळघाटातील जंगलात शेकडो ठिकाणी लहान-सहान श्रद्धास्थाने आहेत. त्यात जीनबाबा, राजदेवबाबा, काडीदेवबाबा कानदरीबाबा, गोट्यादेव, रुपादेव अशी शेकडो ठिकाणे आहेत. त्यात वरली मटकाच्या आहारी गेलेल्यांच्या स्वप्नात देव येतो व तो काही तरी आकडे देऊन जातो, मग चालतो आकड्यांचा खेळ. 

जामली (जि. अमरावती) : देवा, मला परीक्षेत पास कर, माझे लग्न जुळू दे, मला चांगला नवरा मिळू दे, माझ्या व्यवसायात वृद्धी होऊ दे, माझ्या कुटुंबात शांती नांदू दे अशाप्रकाची प्रार्थना आपल्यापैकी अनेकजण करत असतात. पण देवा, मला वरलीचा आकड लागू दे, अशी विनंती जर एखाद्याने केली तर देव प्रसन्न होईल? काय वाटते तुम्हाला? यावर तुमचे काहीही मत असले तरी विदर्भातील एका जंगलात राहणाऱ्या काही महानुभावांची याबाबतीत देवावर प्रचंड श्रद्धा आहे. देवाची मनोभावे पूजा केली तर तो प्रसन्न होऊन आपल्याला वरलीचा आकडा सांगतो, असा या भागातील काही जणांचा समज आहे. त्या भागाचे नाव आहे मेळघाट. 

Image may contain: tree, plant, outdoor and nature

रात्रीच्या अंधारात घडतात वेगळे प्रकार 
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा विदर्भाचे काश्‍मिर म्हणून प्रसिद्ध आहे. याच तालुक्‍यात मेळघाटचे जंगल आहे. निसर्गाच्या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या या जंगलाचे सौदर्य काही निराळेच. त्यामुळे येथे अगदी वर्षभर पर्यटकांची चंगळ असते. मात्र याच मेळघाटच्या जंगलात रात्रीच्या अंधारात काही वेगळे प्रकार घडतात. विविध कारणांनी देवाची आराधना केल्याचे आपल्याला माहिती आहे. मात्र येथे चक्क वरली लागावी, यासाठी देवाला साकडे घालण्यात येते. येथील आदिवासीबहुल भागात कीर्र अंधारात वरलीच्या आकड्यांसाठी रात्र जागून काढली जाते. सकाळी देव प्रसन्न होईल व वरली देईल, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

देव देतो आकडा 
चिखलदरा तालुक्‍यातील जीनबाबा, राजदेवबाबा हे व्याघ्रप्रकल्पातील रस्त्यावरील नावाजलेले ठिकाण. या ठिकाणी वरली मागण्याकरिता देवाच्या दारी जाऊन पूजाअर्चा करून रात्रीला तेथेच मुक्काम ठोकल्या जातो. सकाळी देव वरली देतो, असा समज वरलीबहादरांचा आहे. 

स्वप्नात येतो देव 
याठिकाणचा बराच भाग जंगलाने व्यापला आहे. येथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची देवांवर आजही अफाट श्रद्धा आहे. मेळघाटातील जंगलात शेकडो ठिकाणी लहान-सहान श्रद्धास्थाने आहेत. त्यात जीनबाबा, राजदेवबाबा, काडीदेवबाबा कानदरीबाबा, गोट्यादेव, रुपादेव अशी शेकडो ठिकाणे आहेत. त्यात वरली मटकाच्या आहारी गेलेल्यांच्या स्वप्नात देव येतो व तो काही तरी आकडे देऊन जातो, मग चालतो आकड्यांचा खेळ. 

Image may contain: tree, plant, outdoor and nature

वरलीबहाद्दर रात्रभर झोपतात देवाजवळ 
परतवाडापासून किलोमीटर व अकोटवरून किलोमीटर अंतरावर व्याघ्र प्रकल्पातील जंगलात जीनबाबा हे श्रद्धास्थान आहे. येथे वरलीबहाद्दर रात्रीला झोपतात व सकाळी बाबाने वरलीचा आकडा दिला असे सांगतात. हा आकडा काही प्रमाणात खरा ठरतो, असे सांगण्यात येते व त्यामुळेच याठिकाणी आदिवासी बांधव श्रद्धापूर्वक येतात. 

नागरिकांनी असे करू नये 
व्याघ्रप्रकल्पातील जंगलात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा अधिवास आहे. अशातच जंगलात जाऊन झोपणे म्हणजे केव्हाही जिवाला धोका होऊ शकतो. नागरिकांनी असे करू नये, कोणीही आढळल्यास योग्य ती कायदेशीर 
पाटीवर लिहिलेले वरलीचे आकडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adiwasi worship god for varli matka