बीएससीसाठी ‘वेटिंग लिस्ट’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमित शिक्षक नसल्याचे  कारण देत, बऱ्याच महाविद्यालयातील अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी घातली. यात ग्रामीण भागासह शहरातील शंभराहून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. यामुळे पदवीच्या प्रथम वर्ष  प्रवेशाला नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमित शिक्षक नसल्याचे  कारण देत, बऱ्याच महाविद्यालयातील अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी घातली. यात ग्रामीण भागासह शहरातील शंभराहून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. यामुळे पदवीच्या प्रथम वर्ष  प्रवेशाला नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. 

बारावी परीक्षेचा निकाल लागून दोन महिने झाले. त्यानंतर विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना प्रवेशासाठी कॉमन वेळापत्रक दिले. त्यानुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यात आले. मात्र, निकालात झालेली वाढ व विद्यार्थ्यांचा बीएससी, बीकॉमकडे वाढलेला कल पाहता अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अशक्‍य आहे. काही नामवंत महाविद्यालयांमध्ये आताही दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांची ‘वेटिंग लिस्ट’ आहे. त्यामुळे वीस टक्के वाढीव जागा लवकर मिळाव्या अशी मागणी पुढे येत आहे. एकीकडे बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांची टक्केवारी बघता, शहरातील नामवंत महाविद्यालयातील प्रवेश फुल्ल झाले आहेत. त्यामुळे ६० ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान टक्केवारी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भटकंती करावी लागत आहे.

वाढ मिळण्यापूर्वीच प्रवेश 
विद्यापीठाला महाविद्यालयातील एकूण प्रवेशाच्या वीस टक्के जागा देण्याचा अधिकार आहे.  यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांकडून अर्ज मागविले. जवळपास दोनशे महाविद्यालयांनी तसे अर्ज दिले. त्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, शहरातील बऱ्याच महाविद्यालयांनी मुदतवाढ मिळण्यापूर्वीच वीस टक्के वाढीव जागांवर प्रवेश दिल्याची माहिती आहे. ‘वेटिंग लिस्ट’नुसारच हे प्रवेश करण्यात आले. मात्र, जागा वाढीवर निर्णय होण्यापूर्वीच प्रवेश दिले कसे? हा प्रश्‍न आहे.

यामुळे वाढली मागणी 
विद्यापीठातील ८२ महाविद्यालये संलग्नीकरणाविना असल्याने त्यांचे संलग्नीकरण रद्द  तर जवळपास ९८ महाविद्यालयांतील नियमित अभ्यासक्रमातील प्रवेश बंद करण्यात आले. याशिवाय त्यात ४२ महाविद्यालयांची भर पडली. या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांना नियमित शिक्षक व सोयी-सुविधा नसल्याने प्रवेश गोठविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. यातूनच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे दिसते.

Web Title: admission B.Sc waiting list education