द्विलक्षीच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नागपूर  - शिक्षण विभागाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश देण्यात आले. शुक्रवारी (ता.२९) दूसऱ्या प्रवेश यादीनंतर ३ हजार २१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दिसून आले. मात्र, यानंतर द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी बघावा लागणार आहे. विभागाने अजब आदेश काढून कला,वाणिज्य आणि विज्ञानच्या प्रवेशानंतर द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासनाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी दूसऱ्या भाग भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता तिन्ही शाखांसाठी ३ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. या तिन्ही शाखांचे प्रवेश २५ जुलैनंतर संपणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे असे कळविण्यात आले आहे. मात्र, एक महिना खरोखरच विद्यार्थी प्रवेशासाठी वाट बघणार काय? हा प्रश्‍न आहे. याउलट कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशाची मुभा दिल्यास रिक्त जागा भरण्याची शक्‍यता आहे. तेव्हा शिक्षण विभागाने ही सुट देण्याची गरज असल्याची मागणी महाविद्यालयांनी केली आहे.

सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेसाठी 
शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमातील जागांच्या प्रवेशासाठी २५ जूनपर्यत अर्जाचा दूसरा भाग भरायचा होता. त्यानुसार ३३ हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे समजते. आता ३ जुलैला प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रकाशित केल्या जाणार आहे. यापैकी सर्वाधिक अर्ज हे विज्ञान शाखेसाठी आल्याचे समजते. 

Web Title: admission issue education