भेसळयुक्त मिठाई बाजारात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

अमरावती : दिवाळीच्या दिवसात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई विक्रीस आल्याची शक्‍यता आहे. सणासुदीच्या दिवसांत अन्नऔषध प्रशासनाने मिठाईचे नमुणे तपासणीला ब्रेक दिला. त्यामुळे आकर्षक पॅकिंगमध्ये विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या प्रमाणाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.शिवाय एका व्यापारसंकुल परिसरातून मोठ्या प्रामाणात खव्याचा साठा जप्त केला असून, मिठाई बनविण्यासाठी येणारा या कच्च्या मालातच भेसळ असल्याची शक्‍यता आहे.

शहरात नियमित मिठाई विक्रीची मोठी प्रतिष्ठाने असून काही हॉटेल्स तसेच ड्रायफ्रूटच्या दुकानातही पॅकबंद मिठाईचे बॉक्‍स सजविलेले दिसून येतात. महत्त्वाची बाब म्हणजे विविध फ्लेवर व आकारात तयार होणाऱ्या मिठाईसाठी वापरल्या जाणाऱ्या खव्याची आवक या दिवसांत बाहेर जिल्ह्यातून होते. ही वस्तू नाशवंत असल्यामुळे काही दिवसांपर्यंत स्टोअर करूनसुद्धा ठेवून त्याचा काही दिवसांनी मिठाई तयार करण्यासाठी वापर केल्या जातो. खाताना रुचकर लागणाऱ्या मिठाईचा त्यानंतर शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता अधिक असते. ज्या पर्यायी वस्तूंपासून ही मिठाई तयार होते, त्या वस्तूंचे नमुने हे दिवाळीच्या पूर्वी आणि दिवाळीच्या दिवसांत तपासण्याची प्रक्रिया ही अन्नऔषध प्रशासनाला पार पाडायची असते. परंतु या विभागाकडून शहरातील हॉटेल्स, मिठाई विक्रीची मोठी प्रतिष्ठाने येथे तयार होणाऱ्या मिठाईसह पर्यायी वस्तूंचे नमुने घेण्याच्या कारवाईला ब्रेक बसला. बाजारात विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या मिठाईची नेमकी किंमत किती असावी, यावरही प्रशासकीय निर्बंध नाहीत. त्यामुळे एकाच प्रकारच्या दसरा ते दिवाळीत विकल्या जाणाऱ्या मिठाईची किंमत प्रत्येक दुकानात वेगवेगळी असल्याचे दिसून येते. त्यातून ग्राहकांची एकप्रकारे आर्थिक लूट केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adult dessert market