Maharashtra vidhansabha 2019 : ऍड. श्रीहरी अणे म्हणाले, कॉंग्रेसने विदर्भाच्या प्रश्‍नावर निवडणूक लढावी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नागपूर : लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला विदर्भात हवे ते यश मिळाले नाही. गेल्या विधानसभेतही तेच चित्र होते. मात्र, विदर्भातील कॉंग्रेस आजही ताकदवान आहे. केवळ महाराष्ट्रातील प्रश्‍नावर आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील नेतृत्वात त्यांनी निवडणुका न लढता थेट विदर्भाच्या प्रश्‍नावर निवडणूक लढावी, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी केले.

देवडिया कॉंग्रेस भवन येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकांमध्ये सातत्याने स्वतंत्र विदर्भ देऊ अशी आशा दाखवित भरघोस यश मिळविले. सत्तेत आल्यावर ते विसरले. मात्र, कॉंग्रेसला हा मुद्दा समोर घेऊन जाता येईल. यासाठी दिल्लीतील पक्ष नेत्यांचे विदर्भाच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधावे लागेल. दिल्लीच्या नेत्यांनीही परवानगी द्यावी लागेल, असेही ऍड. अणे म्हणाले.
आजवर पश्‍चिम महाराष्ट्राचेच नेतृत्व विदर्भाला लाभले आहे. येथील नेतृत्व तेवढेच सक्षम आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील समस्या या सर्वच महाराष्ट्रातल्या समस्या राहू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस कमिटीप्रमाणे विदर्भ राज्य कॉंग्रेस कमिटीची स्थापना व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व लोकनायक बापूजी अणे यांचे दुर्मीळ तैलचित्र देवडिया कॉंग्रेस भवनात लावण्यासाठी प्रदान करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adv. Shrihari Aney said, Congress should contest on Vidarbha question