वकिलांनो तयारी करून या, अन्यथा दंडास तयार राहा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर- युक्तिवाद करताना वकील मंडळी तयार नसल्याचे निरीक्षण नोंदवित न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांनी तयारी करून सुनावणीला हजर राहा अन्यथा दावा खर्च (कॉस्ट) ठोठावण्यात येईल, अशी तंबी देणारी लेखी सूचनाच दिली आहे. ही सूचना हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या "कॉज लिस्ट'वर प्रकाशित करण्यात आली आहे. 

याचिकेशी संबंधित प्रश्‍न विचारल्यानंतर वकील मंडळी सोबत असलेली कागदपत्रे तपासतात. बहुतांश वकील तर प्रश्‍न विचारल्यानंतर उत्तर देण्यात असमर्थ ठरल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती देशपांडे यांनी नोंदविले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकरणांमध्ये वकील मंडळी सुनावणीला उभे राहिल्यानंतर उत्तर देण्यास टाळाटाळ करीत असल्याचेही न्यायमूर्ती देशपांडे यांचे म्हणणे आहे. एकीकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या दिवसागणिक वाढत असताना वकिलांद्वारे होणारी टाळाटाळ चिंतेची बाब आहे. यामुळे न्यायालय, पक्षकार यांचा वेळ वाया जातोय. तसेच पक्षकाराला आर्थिक फटकादेखील बसतो. न्यायामध्ये झालेला विलंब हा अन्यायाच असल्याचे म्हटले जाते. यामुळेच वकिलांद्वारे होणारी टाळाटाळ लक्षात घेत न्यायमूर्ती देशपांडे यांनी वकिलांना तंबी दिली आहे. प्रश्‍न विचारल्यानंतर अनावश्‍यक मुद्दे मांडण्याचा प्रकारदेखील वकील मंडळी करत असल्याचे न्यायमूर्तींचे म्हणणे आहे. 

वकिलांनी घेतली धास्ती 
न्यायमूर्ती देशपांडे यांच्याकडे विषम वर्षातील सर्व दिवाणी रिट याचिका आणि विशेष नेमून दिलेल्या प्रकरणांची जबाबदारी आहे. तयारी करून न आल्यामुळे वेळेवर कायद्याची पुस्तके चाळण्याचा प्रकारदेखील काहींनी केला आहे. याची गंभीर दखल न्यायमूर्तींनी घेतली असून वकिलांनीदेखील दावा खर्च बसण्याच्या भीतीने धास्ती घेतली आहे.

Web Title: Advocates prepare for this, otherwise be prepared penalties

टॅग्स