मुस्लिम समजात प्रथम आलेल्या अफशियाला 95 टक्के गुण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

भंडारा : पवनी येथील वैनगंगा विद्यालयची विद्यार्थिनी अफशिया शब्बीर खान या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षित 95.40 टक्के गुण मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यातील मुस्लिम समुदायात अफशिया प्रथम आली. त्याबद्दल अंजुमन अरबी मदरसा व मुस्लिम लायब्रेरी कमिटीच्यावतीने अफशिया व तिच्या परिवारचे घरी जाऊंन अभिनंदन करण्यात आले.

आर्थिकदृष्ट्या गरीब कुटूंबात जन्मलेल्या अफशियाने कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावले नव्हते. तरीही स्वताच्या मेहनतीवर दिवस रात्र परिश्रम घेऊन अभ्यास पूर्ण करून यश मिळाले. पुढे जाऊन तिला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी व्हायचे असल्याचे अफशिया हीने सांगितले. अफशियाला पुष्पगुच्छ देऊन कमिटीचे अध्यक्ष परवेज अली, सचिव इलियास खान, खालिद भाई, जाकिर भाई, हमीद भाई शाहिद अली यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Afshiya, who came first in Muslim society, had 95 percent marks