वैनगंगेत बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला 78 तासानंतर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

आंबेडकर चौक येथील भागवत जनरल स्टोअर्सचे मालक प्रभाकर भागवत यांचा मुलगा चंदू भागवत हा मुलीच्या अॅडमिशन यादी पाहण्यासाठी ता.24 ला दुपारी 11 वाजता नगरपरिषद महाविद्यालयात गेले होते.

पवनी : शहरातील आंबेडकर चौक येथील भागवत लेडीज कॉर्नलचे मालक चंद्रशेखर (चंदू) भागवत या तरूणाने 24 जुलैला दुपारी 12 वाजता वैनगंगा नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. दरम्यान, आज (ता.27) ला गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून 4 किमी अंतरावरील वैनगंगा नदी पात्रात सायंकाळी 5.30 च्या सुमारास या तरुणाचा मृतदेह 78 तासानंतर सापडला आहे.

आंबेडकर चौक येथील भागवत जनरल स्टोअर्सचे मालक प्रभाकर भागवत यांचा मुलगा चंदू भागवत हा मुलीच्या अॅडमिशन यादी पाहण्यासाठी ता.24 ला दुपारी 11 वाजता नगरपरिषद महाविद्यालयात गेले होते. परंतु सायंकाळी 6 वाजतेपर्यंत परत न आल्याने कुटुबातील व्यक्तीने पवनीत शोध सुरु केला असता ताडेश्वर नाका येथे सायकल दिसून आली. त्यानंतर पोलिस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दखल करण्यात आली. त्यावेळी माहिती मिळाली, की दुपारी 12 वाजता गुलाबी शर्ट घालून तरुणाने पुलावरुन उडी घेतली. त्यानंतर रात्रीपासून शोधमोहीम सुरु होती.

वजेश्वर घाट, टेंबरी, खैरना या घाटनवर शोधण्यात आले. परंतु अपयश मिळाले. अखेर आज वडसापासून 4 किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या पात्रात प्रेत दिसले. भागवत परिवाराला मिळालेले तृणाचे फोटो दाखवून खात्री करण्यात आली. ही घटना समजल्यावर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले.

Web Title: After 78 hours the bodies of the young drowned in Wainganga river were found