जिल्हा अधिकाऱ्यांची अठरा वर्षांनंतर अतिसंवेदल नक्षलग्रस्त भागाला भेट

gadchiroli
gadchiroli

कोरची - कोरची तालुक्यातील बेळगाव येथील राज्यस्व. राणी मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करून गडचिरोलीकडे जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांच्या गाड्यांचा ताफा परतीच्या प्रवासाला निघाला होता. परंतु, अनपेक्षितपणे कोरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोडगुलकडे हा ताफा वळाला आणि पोलिसांची धांदल उडाली. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा गाड्यांचा ताफा थांबवून हा भाग अती संवेदनशील नक्षलग्रस्त भाग असल्याचे सांगितले. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जाणे बरोबर नसल्याचे सांगितले. तरी देखील ''तुम्ही परत जा मी जाऊन येतो'' म्हणून जिल्हाधिकारी कोडगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय आश्रम शाळा व राज्य स्व. राणी मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली.

या परिसरातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. कोडगुल परिसरात समस्यांचा असलेला डोंगर जिल्हाधिकाऱ्यांनी ''याची देही याची डोळा'' बघून घेतले. कोडगुल परिसरात सात ग्रामपंचायती असून, 40 गावे आहेत. या परिसरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रम शाळा, पोलीस मदत केंद्र, जिल्हा कॉपरेटीव बँक असे शासकीय कार्यालये आहेत. या परिसरात कोडगुलला वीजपुरवठा धानोरा तालुक्यातील होत असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित  राहतो. त्यामुळे त्या परिसरात उन्हाळा असो की पावसाळा असो आठवड्यातून फक्त एक ते दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत असतो. त्यामुळे त्या परिसरात काम करणारे कर्मचारी व गावकऱ्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. 

या परिसरात बीएसएनएलचे कसल्याही नेटवर्क नाही त्यामुळे या परिसरातील लोक छत्तीसगडच्या बीएसएनएल नेटवर्कर रोमिंग बोलणे होत असते. तिथे जिल्हा कॉपरेटवह बँकेची शाखा असून नेटवर्क बरोबर चालत नसल्यामुळे त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार वेळेवर होत नाही. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना दोन दोन दिवस शंभर दोनशे रुपये काढण्यासाठी ताकळत उभे राहावे लागते. या परिसरात कोणत्याच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे या परिसरात काम करणारे कर्मचारी हे 70 ते 80 किलो किलोमीटर अंतरावरून ये जा करतात. त्यामुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण सुद्धा मिळू शकत नाही. कोडगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक भडगाव येथील डॉक्टर हरिष टेकाम असल्याने ते मुख्यालय उपस्थित राहतात. त्यामुळे आरोग्याची सेवा ही सुरळीतपणे मिळत  असली, तरी दुसरे डॉक्टर वासनिक मातरम हे महिन्यातून एक ते दोन दिवस येऊन वर्षाकाठीचा पगार पूर्णपणे घेत असतात. 

कोडगुल वरून 15 किमी अंतरावर असलेल्या गयारापती येथे प्राथमिक आरोग्य पथक आहे त्या ठिकाणी डॉ. नाही शासकीय आश्रम शाळा पोलीस मदत केंद्र आहे. पण त्या परिसरात डॉक्टरांची नियुक्ती करूनही याठिकाणी उपस्थित राहत नाही. या परिसरात एकाद्या आजारी पडल्यास कोरचीला 50 किमी अंतरावर घेऊन यावे लागते या परिसरात एखाद्या महिलेला प्रस्तुतीच्या वेदना झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे तसा औषधे साठा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे त्या महिलेला कोरचीला रेफर केला जातो. परंतु, रस्त्यांची दयनीय अवस्था त्यामुळे त्या महिलांचा प्रस्तुती रस्त्यावरच होईल अशा पद्धतीचे रस्ते असल्याने या चाळीसगावातील लोक जीव मुठीत घेऊन कसंतरी जगत आहेत.

या परिसरात नाडेकल, मोठा झेलीया, भीमनखोजी, बोटेझरी, आलोंडी, अशा आठ ते दहा गावांमध्ये अजूनही विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणारा राज्य शासनाने अशी दयनीय अवस्था या परिसरातील चाळीस गावातील लोकांची आहे. ही परिस्थिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाणून घेतली. लोकप्रतिनिधी वरील विश्वास उरलेल्या परिसरातील लोकांना आता आमचा काहीतरी होईल ही आशा पल्लवित झालेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या भेटीने विकास नक्कीच होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

या वेळी उपविभागीय अधिकारी महसूल विशाल मेश्राम कोरची तहसिलदार सौ पुष्पा कुमरे उपस्थित होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अडतानी यांनी 2001मध्ये टिपागड भेट दिली. होती तेव्हा पासून या परिसरात येणारे हे पहिले जिल्हाधिकारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com