प्रेयसीवर चाकू हल्लानंतर प्रियकराने केले विषप्राशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नंदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला केला. तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर प्रियकराने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दोघेही बचावले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांनाही उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. 

चेतन सुरेश गजभे (वय 22 वर्ष) असे प्रियकराचे नाव आहे. तो चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. याच महाविद्यालयातील एका तरूणीशी मागील चार वर्षांपासून प्रेमसबंध होते. चेतनने तिच्या कुटुुंबीयाकडे लग्नाची मागणी केली होती. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी लग्नाला विरोध दर्शविला. त्यामुळे तो संतप्त झाला होता. आज 27 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला ती मुलगी महाविद्यालयातून परत येत असताना गावाच्या वेशीवर तिला अडविले. खिशातून धारदार चाकू काढला आणि तिच्यावर सपासप वार केले. तिच्या सोबतीची मैत्रीण या घटनेने हादरून गेली. ती ओरड गावात गेली. घटनेची माहिती मिळताच गावकरी मदतीसाठी धावले. तोपर्यंत प्रियकर तेथून पसार झाला होता.

दरम्यान, त्याने विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारांसाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After a knife attack on Lover the boy gets poison