दफनविधी केलेला मृतदेह बाहेर काढून दोन महिन्यांनंतर केले शवविच्छेदन

दफनविधी केलेला मृतदेह बाहेर काढून दोन महिन्यांनंतर केले शवविच्छेदन

बाळापूर (अकोला) : शहरातील जवळी वेस येथील 17 वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला असल्याच्या निनावी पत्रावरून या प्रकरणी तब्बल दोन महिन्यांनी मृतदेह उकरून आज रविवारी (ता. 05) रोजी जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

बाळापूर शहरातील जवळी वेस भागात वास्तव्यास असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा 09 मार्च रोजी मृत्यू झाला होता. तिच्या आईवडील व नातेवाईकांनी तिच्यावर समाज प्रथेनूसार दफनविधी करण्यात आला होता. मात्र दफनविधीच्या अकरा दिवसांनीच म्हणजे 20 मार्च रोजी बाळापूर पोलिसांना एक निनावी पत्र प्राप्त झाले. मुलीच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त होत असून मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या नातेवाईकांनी बदनामी होऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवत तिचा दफनविधी उरकून घेतला असल्याची धक्कादायक माहिती त्या पत्रात होती. त्यानंतर पुन्हा 24 मार्च रोजी इलियास अहमद अब्दुल सादिक कुरेशी (रा. बाळापूर) यांनी देखील अशाच आशयाची लेखी तक्रार पोलिसांकडे देत चौकशीची मागणी केली. हे प्रकरण गांभीर्याने घेत ठाणेदार गजानन शेळके यांनी तत्काळ चौकशी सुरू केली. या प्रकरणात अंतिम संस्कारात सहभागी असलेल्या नागरिकांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र हा मृत्यू नैसर्गिकच असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तपासात पारदर्शकता व्हावी म्हणून ठाणेदार गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी बारकाईने तपास करून 01 मे रोजी 
अकस्मात मृत्यूची नोंद करुन उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांची परवानगी घेत दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी 
डॉ. सचिन गाडगे, डॉ. कुलकर्णी व  चमूने निवासी नायब तहसीलदार कोठेकर व सरकारी पंचा समक्ष मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. 

सत्यता आढळल्यास कारवाई करणार
या प्रकरणात सत्यता आढळून आल्यास सविस्तर चौकशी करून व शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच यात दोषी आढळणाऱ्या विरुध्द कठोर कार्यवाही करणार असल्याचे ठाणेदार गजानन शेळके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com