आघाडीसाठी ३० जानेवारीची ‘डेडलाइन’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

अकोला - वंचित बहुजन आघाडीची स्थापना जुलै २०१८ मध्ये झाली, त्यानंतर काँग्रेसला १२ लोकसभा मतदारसंघाचा प्रस्ताव देण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेरी झाल्या आहे. मात्र, चर्चेतून काँग्रेस ‘एमआयएम’ पलीकडे सरकली नाही. आता ३० जानेवारीपर्यंत काँग्रेसने कोणताही निर्णय घेतला नाही, तर ३१ जानेवारीला श्रीरामपूर येथे बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडी पुढील निर्णय जाहीर करेल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी जाहीर केले.

वंचित बहुजन आघाडीने आघाडीसाठी जुलैमध्ये काँग्रेसला १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. या बारा जागांवर काँग्रेसला मागील तीन निवडणुकांमध्ये एकदाही विजय मिळाला नाही आणि काही ठिकाणी तर त्यांच्याकडे उमेदवारसुद्धा नाही. या जागा वंचित आघाडीला दिल्यानंतर विजयाचेही आम्ही बघून घेऊ, त्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले जाणार नाही, असे प्रस्तावात नमूद आहे असेही ते म्हणाले.

मार्ग मोकळा करणार
वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांनी चोऱ्या केल्या नाहीत, बॅंका बुडविल्या नाहीत किंवा त्यांचे कोणतेही उद्योगधंदे नाहीत म्हणजे त्यांच्याकडे काळा पैसा नाही. ते गरीब आहेत, भांडवलदार नेते नाहीत. त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी किमान दोन महिने तरी लागतील. त्यामुळे आम्हाला आमचा मार्ग मोकळा करावयाचा आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Aghadi Prakash Ambedkar Congress MIM Politics