देवा हो देवा, तुमसे बढकर कौन ?

Agination-against-municipal
Agination-against-municipal

नागपूर - अयोध्येतील राममंदिरावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद असले तरी  नागपूरमध्ये सर्वच राजकीय पक्ष मंदिर-मशीद वाचविण्यासाठी एकवटले आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने रस्ते, फुटपाथसह आणि खुल्या पटांगणांवरील धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालविणे सुरू केल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. याची दखल सर्वच राजकीय पक्षांना घेणे भाग पडले असून देवालये वाचविण्यासाठी सारेजण सरसावले आहेत. 

सोमवारी नरेंद्रनगर परिसरातील नागरिकांनी रिंगरोड सुमारे तासभर रोखून धरला. यामुळे वर्दळीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. महालिकेतील सत्तेपक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात त्रिमूर्तीनगरातील नागरिकांनी दत्तमंदिर कारवाईच्या विरोधात निदर्शने केली. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, नगरसेवक बंटी शेळके यांनी आज रस्त्याच्या मध्यभागी  असलेल्या विद्युत खांबाला शेंदूर फासून आरती, पूजा करून महापालिकेला आव्हान दिले. ॲड. अभिजित वंजारी यांनी वर्धमानगरातून कीर्तन-भजनाचा गजर करीत भव्य रॅली काढली तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल लोकजागृती मोर्चाने केला आहे. 

विद्युत खांबाला शेंदूर 
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उभ्या असलेल्या विद्युत खांबांना शेंदूर फासून अभिनव आंदोलन केले. यामुळे १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंदिर-मशिदी आधी जीव घेणारे खांब आधी हटविण्याची गरज आहे. हे खांब आठवडाभरात न काढल्यास त्यावर मंत्र्यांचे फोटो टांगले जातील, असे शेळके यांनी म्हटले आहे.

प्रार्थनास्थळावरून निर्माण झालेल्या संतापाला सर्वस्वी भाजपचे नेते जबाबदार आहेत. न्यायालयाने वेळीच सचेत केल्यानंतरही भाजपच्या ताब्यातील महापालिका प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत. त्यामुळे विहारे, मशिदी आणि मंदिरांवर हातोडा चालला. अनधिकृत ले-आउटच्या नियमितीकरणाप्रमाणेच प्रार्थनास्थळांसाठीही असाच लोकहितकारी अध्यादेश काढण्याची गरज आहे. 
- अतुल लोंढे,  प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस

प्रशासनाच्या कारवाईविरोधात गेल्यास होणाऱ्या परिणामाची चिंता न करता मोकळ्या जागा, सार्वजनिक वापराच्या जागांवरील धार्मिक स्थळांवर कारवाईविरोधात आम्ही जनतेसोबत आहेत. यासाठी नगरसेवकपद आणि सत्ता गेली तरी चालेल. मंगळवारी भाजपचे ११२ नगरसेवक महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कारवाईला असलेला विरोध त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. धार्मिक स्थळांच्या यादीत चुका करणाऱ्यांना सभेत जाब विचारू.
- संदीप जोशी, सत्तापक्षनेते 

कारवाईच्या विरोधात पूर्व नागपुरात वर्धमाननगरातून हजारो नागरिकांनी कीर्तन, भजने गात रॅली काढली. न्यायालयाने फक्त रस्ते व फुटपाथवरील धार्मिक वास्तू हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, पालिकेचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव यांनी न्यायालयाची दिशाभूल केली. त्यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली आहे. 
- ॲड. अभििजत वंजारी, प्रदेश सचिव काँग्रेस

प्रशासनाने आतापर्यंत २५० मंदिरे तोडली. त्यावरून शासनाचे डोके ठिकाणावर नसल्याचे स्पष्ट होते. आता एक ऑगस्टला आयुक्तालयावर धडक दिली जाईल. कोर्टाच्या निर्णयानंतर  हायवेवरील बार सुरू होऊ शकतात, तर प्रार्थनास्थळांवरील कारवाई का थांबवली जाऊ शकत नाही?
- रमण सेनाड, संयोजक, लोकजागृती मोर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com