Video : हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले आंदोलक, मोर्चा शांततेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

शुक्रवारी नागपुरात निघालेला मोर्चा आदर्श मोर्चा ठरला. या मोर्चाचे नेतृत्व कोणत्याही संघटनेने केले नसून केवळ मौलाना मुफ्ती मुजीब यांच्या हाकेला ओ देत मुस्लिम बांधव स्वयंस्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले. चिटणीस पार्कवरून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. एलआयसी मोर्चा पॉईंटवर या मोर्चाला थांबविण्यात आले.

नागपूर : एखाद्या विषयावर आपला आक्षेप असल्यास कोणत्याही प्रकारची हिंसा न करता देखील विरोध प्रदर्शित करता येतो. नागपुरात निघालेल्या मुस्लिम समाजाच्या मोर्चाने जणू हाच वस्तुपाठ घालून दिला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात नागपुरातील मुस्लिम बांधव शुक्रवारी (ता. 20) रस्त्यावर उतरले होते. यावेळी कोणीही घोषणाबाजी केली नाही की, नारे लावले नाहीत. शांततामय मार्गाने हजारोंच्या संख्येने ते आंदोलनस्थळी एकत्र आले. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्य भारतात सुरू झालेल्या आंदोलनाची धग देशभर पोहोचली आहे. "दिल्ली ते गल्ली' या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मात्र, शुक्रवारी नागपुरात निघालेला मोर्चा आदर्श मोर्चा ठरला.

Image may contain: 1 person, crowd and outdoor

 

Image may contain: 16 people, crowd and outdoor

 

Image may contain: 8 people, crowd and outdoor

 

या मोर्चाचे नेतृत्व कोणत्याही संघटनेने केले नसून केवळ मौलाना मुफ्ती मुजीब यांच्या हाकेला ओ देत मुस्लिम बांधव स्वयंस्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले. चिटणीस पार्कवरून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. एलआयसी मोर्चा पॉईंटवर या मोर्चाला थांबविण्यात आले. यावेळी मोर्चाचे शेवटचे टोक रामझुल्यावर होते. यावरून या मोर्चाच्या भव्यतेचा अंदाज लावता येतो. 

हेही वाचा - भिवापुरी मिरची, नागपूरची संत्री, आता चिन्नोर तांदूळ बनेल ब्रॅंड

धार्मिक झेंड्यांऐवजी तिरंगा 
या मोर्चात कोणत्याही प्रकारचे धार्मिक झेंडे दिसले नाहीत. अनेक मोर्चेकऱ्यांच्या हातात तिरंगा ध्वज बघायला मिळाला. नारेबाजी न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व मोर्चेकरी "दुरूद ए पाक'चे जप करीत मार्गक्रमण करीत होते. काही मोर्चेकऱ्यांच्या हातात संविधानाची प्रत होती तर काहींनी "सेव्ह कॉन्स्टीट्युशन, सेव्ह नेशन' लिहिलेले पोस्टर हाती घेतले होते. या मोर्चात सुमारे 25 हजार मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचा अंदाज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against NRC and CAB at nagpur