बँक विलीनिकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

अकोला : बॅंकेतील नऊ संघटनाच्या युनायटेड फोरम तर्फे बॅंक ऑफ महाराष्ट्र, गांधी रोड शाखेसमोर बुधवारी (ता. 26) जोरदार निदर्शने व घोषणा देण्यात आल्या.

अकोला : बॅंकेतील नऊ संघटनाच्या युनायटेड फोरम तर्फे बॅंक ऑफ महाराष्ट्र, गांधी रोड शाखेसमोर बुधवारी (ता. 26) जोरदार निदर्शने व घोषणा देण्यात आल्या.

या एकदिवसीय संपात युनायटेड फोरम ऑफ बॅँक युनियन्सच्या झेंड्याखाली संघटीत सर्व कामगार संघटनांचे दहा लाखावर कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. हा संप प्रामुख्याने विजया बॅंक, बॅँक ऑफ बडोदा, देना बॅंक यांच्या एकत्रीकरणाच्या विरोधात आहे. एकत्रीकरण हे अर्थव्यवस्थेच्या हिताचे नाही. बॅँकांच्या, बॅँक ग्राहकांच्या व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही. बॅँकींग उद्योगापूढे एनपीएमुळे जे प्रश्न उभे आहेत. त्यावर एकत्रीकरण हा उपाय होऊ शकत नाही. म्हणूनच त्या विरोधात बँक कर्मचारी रस्त्यावर उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युनायटेड फोरम ऑफ बॅँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ.श्याम माईणकर, कॉ.दिलीप फिटके, कॉ.प्रकाश दाते, कॉ.गजानन पवार, कॉ.दिलीप देशमुख, कॉ.दिपक निळ, कॉ.सुनील दुर्गे, कॉ.सुधीर देशपांडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना संपाबद्दलची माहिती देऊन मार्गदर्शन केले. 

यावेळी गांधी रोड येथील बॅँक ऑफ महाराष्ट्रासमोर जवळपास पाचशे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉ.प्रवीण महाजन, कॉ.अनिल मावळे, कॉ.अनिल बेलोकर, कॉ.लोडम, कॉ.मोतलघ, कॉ.धीरज बैस, कॉ.उमेश शेळके, कॉ.नवथळे, कॉ.प्रकाश देशपांडे, कॉ.मंगेश डामरे, कॉ.संतोषकुमार, कॉ.अरविंद पाटील, कॉ.मावंदे, कॉ.अमोल गिरबिले, कॉ.प्रकाश देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: agitation by bank employees against bank merging in akola