भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 30 मार्च 2018

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या समाज बांधवांनी पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन केले.

भिगवण - बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळ चिखली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या समाज बांधवांनी पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी घटनेचा निषेध करत संबंधितावर कडक कारवाई करण्याची व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानजनकरित्या पुर्नस्थापित करावा अशी मागणी केली.

बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळ चिखली येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद भिगवण व परिसरामध्ये उमटले. शुक्रवारी (ता. 30) सकाळी भिगवण व परिसरातील समाजबांधवानी घटनेच्या निषेधार्थ पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग रोखला. येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिरापासून मोर्चास सुरवात करण्यात आली. यावेळी लोकशाहीरांच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोर्चामध्ये डॉ. राजन सोनावणे, कृष्णा भिसे, तक्रारवाडीचे माजी सरपंच गणेश वायदंडे, अजय भिसे, सुनील पवार, पोपट लांडगे, गणेश लांडगे, तुकाराम पवार, विजय खंडाळे, राजू गाडे, सिताराम लांडगे, सचिन पवार, रामभाऊ अवघडे, अगतराव पवार आदींसह भिगवण, तक्रारवाडी, कुंभारगाव (ता. इंदापुर) येथील समाजबांधव सहभागी झाले होते. डॉ. राजन सोनवणे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट चऴवळ, प्रबोधन व साहित्याच्या क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. अशा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पुतळ्याची सन्मानपुर्वक प्रतिष्ठापना करण्यात यावी. कृष्णा भिसे, तुकाराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. समाज बांधवांच्या वतीने भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  
 

Web Title: Agitation at Bhigvan for statue disgrace