कमालंच की, मटणानंतर आता बोकडाच्या चामड्यासाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

पूर्वी बोकडाच्या चामड्याला पुरेसा दर मिळत होत. तीच मटणविक्रेत्यांची कमाई असायची. परंतु, आता चामड्याला दहा रुपयेसुद्धा भाव मिळत नसल्याने ते फेकून द्यावे लागत आहे. यामुळे मांसविक्री करणाऱ्या दहा हजार व्यावसायिक विवंचनेत सापडले आहेत.

नागपूर : काही दिवसांपूर्वीच मटणाचे वाढलेले भाव पाहून कोल्हापूरवासीयांनी आंदोलन केले होते. मटण 520 रुपये किलो झाल्याने त्यांच्यात रोष होता. आंदोलन करून त्यांनी भावात घट करीत 480 रुपये किलो भाव करून घेतला होता. याच धर्तीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात खाटीक समाजबांधवांनी चामड्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, यासाठी आंदोलन केले. बोकडाच्या चामड्याला 350 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी विदर्भ खाटीक समाज संघर्ष समितीच्या मोर्चाने गुरुवारी विधानभवनावर धडक दिली.

उघडून तर बघा - सकाळ संध्याकाळ वाघाचे  रस्त्यावर वॉक

अधिवेशन आणि मोर्चे हे नेहमीचे समीकरण आहे. विधानभवन परीसर विविध संघटनांचे मोर्चेकरी आणि आंदोलकांच्या राहुट्यांनी अधिवेशन काळात गजबजलेला असतो. सभागृहाच्या आत विविध मागण्यांसाठी विरोधक गोंधळ घालत आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम होत असून, काहीही साध्य होत नसल्याचे दिसत आहे.
 

Image may contain: 17 people, people standing, crowd and outdoor
नागपूर : मोर्चात सहभागी विदर्भ खाटीक समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य. 

सरीकडे विविध संघटनेचे प्रतिनिधी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चे काढत आहे. यासाठी त्यांना पोलिस संरक्षणही देण्यात येत आहे. अधिवेशनाचा चौथा दिवस वेगळ्याच मोर्चाने चर्चेचा ठरला. अवघ्या बारा मोर्चेकऱ्यांना तब्बल पंचवीस पोलिसांनी संरक्षण दिल्याने मोर्चा आकर्षणाचे केंद्र ठरला होता.

मोर्चेकरी बारा अन्‌ संरक्षण पंचवीस पोलीसांचे

पूर्वी बोकडाच्या चामड्याला पुरेसा दर मिळत होत. तीच मटणविक्रेत्यांची कमाई असायची. परंतु, आता चामड्याला दहा रुपयेसुद्धा भाव मिळत नसल्याने ते फेकून द्यावे लागत आहे. यामुळे मांसविक्री करणाऱ्या दहा हजार व्यावसायिक विवंचनेत सापडले आहेत. चर्मोद्योग महामंडळाला सरकारकडून कोट्यवधींचा निधी दिला जातो. या निधीतून महामंडळाने चामडे खरेदीची योजना सुरू करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाचे नेतृत्व सुखदेव ढोके, धनराज लारोकर, मोहम्मद फहिम गौस, अशोक दुर्गे, ओमेश्‍वर तुमाने, यादवराव पारवे, कार्तिक लारोकर, विजय पारधी व शैलश पारधी यांनी केले.
मोर्चात केवळ दहा ते बरा जण असल्याने चर्चा होत होती. मोर्चेकऱ्यांना याबाबत विचारले असता, आम्ही दहा ते बरा जणांनी मोर्चा काढला असला तरी समोर आमचे कार्यकर्ते आहेत. ते नंतर मोर्चात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.

अन्य मागण्या

  • योग्य भावात बोकड उपलब्ध करून द्या!
  • आमची उपजीविकाच या धंद्यावर अवलंबून असल्यामुळे विशिष्ट सणांवर मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची पद्धत संपवा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for goat skin price after mutton