अकार्यक्षम गटविकास अधिकारी वाघमारे विरुद्ध तालुका काँग्रेसचा तिव्र आंदोलनाचा इशारा

मनोहर बोरकर
बुधवार, 4 जुलै 2018

तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून लाभार्थी कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे त्यांचे कर्तव्यकाळाची चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) - येथील गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे अकार्यक्षम असून त्यांनी कर्तव्यावर रुजू झाले पासून एक दिवसही मुख्यालयी हजार राहून कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून लाभार्थी कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे त्यांचे कर्तव्यकाळाची चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

वाघमारे हे गेली दीड वर्षापासून पंचायत समिति एटापल्ली येथे कार्यरत आहेत ते रुजू झाले पासून मुख्यालयी उपस्थित न राहता पस्तीस कि. मी. अहेरी या शहरातून ये- जा करतात व महिन्यातील आठ ते दहा दिवस गैरहजर असतात, त्यामुळे इतरही विस्तार अधिकारी व कर्मचारी हे बाहेरील शहरातून ये-जा करून कर्तव्य बजावत आहेत. परिणामी विकास कामे व योजनांवर विपरीत परिणाम होऊन, घरकुल, शौचालय, सिंचन विहिरी व इतर शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभाच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. 

तालुक्यातील ग्रामपंचायत उडेरा, गुरूपल्ली, येमली, पुरसलगोंदी, जाम्बिया, कसनसुर, वाघेझरी, जारावंडी, गट्टा, इत्यादी ३१ ग्रामपंचयती अंतर्गत नागरिकांना शौचालय, घरकुल, सिंचन विहिरी व इतर योजना शासन स्तरावरन मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे लाभार्थ्यांनी पदरमोड करून मंजूर कामांची बांधकामे पूर्ण केली मात्र एक ते दोन वर्षाचा कालावधी होऊनही मंजूर निधी रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नाही त्यामुळे लाभार्थी नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. 

तसेच पंचायत समिती मालकीच्या मुख्य बाजारपेठेतील दोन ते तीन एक्कर भूखंडावर भूमाफियांचे बेधड़क अतिक्रमण करून भूखंड हडप करण्याचा प्रकार होतांना गटविकास अधिकारी वाघमारे हे नागरिकांचे तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही निवेदनातून केला आहे. 

त्यामुळे अशा अकार्यक्षम गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे संपूर्ण कार्यकाळाची सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हापरिषद सदस्य संजय चरडुके, रमेश गोटा, चुक्कू गावडे, बाबूराव गोटा, प्रफुल जुनघरे, दानू पुंगाटी, लक्ष्मण नरोटी, लालू लेकामी, दोहे गोटा, कोत्तु गोटा व माधव नरोटी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केली आहे अन्यथा तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने तिव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

मी मुख्यालयी उपस्थित राहून कर्तव्य बजावत नसलो तरी नियमित व वेळेवर कार्यालयात हजार असतो, कोणीही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित नाही शासन स्तरावरील मंजूर निधी ग्रामपंचायत अंतर्गत वितरणाची कार्यवाही सुरु आहे. - अनिल वाघमारे, गटविकास अधिकारी पंचायत समिति एटापल्ली
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Agitation of Taluka congress against group development officer Waghmares