'जिप'च्या शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याच्या विरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

अकोला - जिल्हा परिषदच्या शाळांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी शैक्षणिक समन्वय समितीने मंगळवारी (ता. 2) जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शाळांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून स्पर्धा निर्माण होईल. खासगी शाळांमध्ये वर्गखोल्या, आवश्‍यक अर्हताधारक शिक्षक, आवश्‍यक भौतिक सुविधा या सर्व बाबी उपलब्ध आहेत. सर्व बाबींचा विचार करून जिल्हा परिषदच्या शाळांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शैक्षणिक समन्वय समितीने केली आहे.
Web Title: agitation for zp school fifth & eight class connected