शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका; कृषीतज्ज्ञांचे आवाहन

Agricultural expert appeal to farmers
Agricultural expert appeal to farmers

यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात तब्बल चार लाख 80 हजार हेक्‍टरवर कापसाचा पेरा होण्याची शक्‍यता आहे. बोंडअळीमुळे दोन वर्षांपासून बियाणे आणण्यापासून तर विक्रीपर्यंच्या तारखा निश्‍चित केल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी मंगळवार (ता.26) पासून जिल्ह्यात बियाणे विक्रीला सुरुवात झाली आहे.

कापूस जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे. दरवर्षी कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे बियाण्याचे नियोजन करणे तसेच बियाणे उपलब्ध ठेवून हे अत्यंत महत्वाचा विषय कृषी विभागासमोर आहे. अशातच गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या बोंडअळीमुळे कंपनीतून कृषी सेवा केंद्र व त्याठिकाणाहून शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहोचविण्याचे वेळापत्रक निश्‍चित करून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच बियाणे विक्री होत आहे. मंगळवार (ता. 26)पासून जिल्ह्यात बियाणे विक्रीला कृषी सेवा केंद्रातून सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला आवश्‍यक असलेल्या कापूस बियाणे मुबलक प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध झालेले आहे. बियाणे विक्रीला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

या काळात पेरणी केल्यास गुलाब बोंडअळी परत येण्याची शक्‍यता जास्त असते. जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्‍यता आहे. यात सर्वाधिक चार लाख 80 हजार हेक्‍टर कापसाचा पेरा असणार आहे. दोन लाख 50 हजार हेक्‍टरवर सोयाबीन तर, एक लाख 50 हजार हेक्‍टरवर तूर पिकांचा पेरा होण्याचा अंदाज आहे. यासाठी आवश्‍यक असलेले बियाणे उपलब्ध असून, टंचाई येणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

55 हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

खरीप हंगामासाठी युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, मिश्र खत अशा सर्व खतांची मागणी एक लाख 72 हजार 262 मेट्रिक टन आहे. यातील एक लाख 66 हजार 470 मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे. यातील आतापर्यंत जिल्ह्याला 55 हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यासाठी आणखी रॅंक लागत असल्याने खतांचा पुरवठा वेळेत होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार बियाणे विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत शंभर मीलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी.
- पंकज बरडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com