कृषी विद्यापीठ गाजविणार ‘मैदान’

अनुप ताले
सोमवार, 21 मे 2018

अकोला : शिक्षण हे वाघिनीचे दूध असले तरी, ते पचविण्यासाठी शरीर वाघासारखे चपळ व स्फुर्थीले असणे तेवढेच गरजेचे आहे. शिवाय शिक्षणाएवढेच किंबहूना त्याहूनही अधिक महत्त्व क्रीडेला आले आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासोबतच राष्ट्रीय स्थरावर विद्यार्थी चमकविण्याचा ध्यास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी घेतला असून, दर्जेदार प्रशिक्षकांकडून सराव सत्रही सुरू केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी आज देशभराताच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असून, कृषी शिक्षणाचे महत्त्व विषद करत आहेत. त्यांच्या शैक्षणिक योगदानातून, देशाला गौरवांकीत करत अाहे. याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाचे योगदान असावे, येथील विद्यार्थींची खेळातून दशदिशा किर्ती पसरावी या हेतूने कुलगुरू डाॅ. विलास भाले यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यासाठी सुसज्य मैदानाची निर्मितीसुद्धा करण्यात आली आहे.

कुलगुरुही मैदानात...
विद्यापीठाच्या मैदानावर रोज सकाळ-संध्याकाळ विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण दिले जात अाहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून, स्वतः कुलगुरू डॉ. भाले नियमित मैदानावर उतरून मुलांसोबत सराव करतात. त्याच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्‍ये उत्साह दिसून येतोच, सोबतच विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारीसुद्धा मैदानात धावताना दिसत आहेत.

Web Title: agriculture college students in sports