कृषी विभागाचा सर्व्हे घरबसल्या 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 29 सप्टेंबर 2019

नागपूर : मागील दोन महिन्यांपासून सततधार पाऊस सुरू आहे. सावनेर मतदारसंघातील सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यातील पिकांचा कृषी विभागाने सर्व्हे केला आहे. यात 33 टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. एकंदर परिस्थिती पाहता शेतकरीच शेतात जाऊ शकत नाही. मग कृषी विभागाने केलेला सर्व्हे खरा कसा? असा सवाल कळमेश्‍वर व सावनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेतून केला. 

जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, म्हणाले, मागील वर्षी दुष्काळ व यंदा सतत पावसामुळे पऱ्हाटीची वाढ खुंटली आहे. अद्याप पात्या आल्या नाहीत. तूर पिवळी पडली आहे, सोयाबीन हातचे गेले. शेतकरी पिकांची मशागत करू शकत नाही अशी अवस्था असताना कृषी विभाग बांध्यावर गेलाच कसा व त्यांनी पाहणी कशी केली असावी. 33 टक्केपेक्षा कमी नुकसान असल्याचा प्राथमिक अहवाल असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. सावनेर व कळमेश्‍वर या दोन्ही तालुक्‍यात शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, नदी नाल्याकाठील शेती खरडून निघाली आहे, ल्यानेही नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे कृषी विभागाने पुन्हा सर्व्हे करावा यासाठी मंगळवारी आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात येणार आहे. 
बाबा कोढे यांनी दुष्काळदरम्यान शेतकऱ्यांची अवस्था विशद केली. ते म्हणाले, मागील वर्षी सरकारने दुष्काळ जाहीर केला होता. त्या काळात ज्या घोषणा केल्या त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. यावेळी इतर प्रगतिशील शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. 

संत्रा बागायतदार अडचणीत 
सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक आहेत. मागील वर्षी दुष्काळामुळे अनेकांच्या संत्रा बागा वाळल्या. आता जास्त पावसामुळे संत्र्यावर बुरशीजन्य रोग आले आहेत. संत्रा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी सरकारने मदतीची गरज आहे. मात्र, कृषी विभागाकडून चुकीचे अहवाल पाठविण्यात येत असल्याने संत्रा बागायतदार अडचणीत आला असल्याचे यावेळी संत्रा उत्पादक शेतकरी म्हणाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Department survey conducted