चौकटीबाहेर जाऊन शेतीचा विचार करा - नितीन गडकरी

Nitin-Gadkari
Nitin-Gadkari

नागपूर - चौकटीबाहेर जाऊन शेतीचा विचार केला तरच शाश्‍वत शेतीच्या संकल्पनेला आपण प्रत्यक्षात आणू शकू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी  यांनी केले. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘भारतीय शेतीचे भविष्य’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत अर्थतज्ज्ञ डॉ. आर. एस. देशपांडे, कृषी संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस. ए. पाटील, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, डॉ. सी. डी. मायी, पीपीव्ही आणि एफआरचे अध्यक्ष डॉ. के. व्ही. प्रभू, पंजाब सरकारच्या शेतकरी आयोगाचे अध्यक्ष अजय वीर जाखड, ज्येष्ठ पत्रकार जी. चंद्रशेखर अय्यर, भारत कृषक समाज संघटनेचे अध्यक्ष कृष्ण वीर चौधरी, सहकार आणि औद्योगिक संबंधविषयक संघटनेचे अध्यक्ष सागर कौशिक यांनी सहभाग घेतला. 

नितीन गडकरी म्हणाले, ‘दुकानदार किंवा अमुक व्यक्ती सांगतेय म्हणून पिकांना खतं किंवा पाणी न देता, स्वत: अभ्यास करा. तंत्रज्ञानाच्या आधाराने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शेती करण्याचे शास्त्रशुद्ध पद्धतही समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी आणि कृषी विद्यापीठ तसेच शेतकरी संघटनांचा समन्वय निर्माण करण्यासाठी काम करण्याची गरज आहे.’ बांबूला उसाची किंमत देण्याचा सरकारचा मानस असून बायोइथेनॉलची दोन लाख कोटींची इंडस्ट्री उभारण्याची तयारी सुरू असल्याचेही गडकरी म्हणाले.
डॉ. आर. एस. देशपांडे यांनी कृषी क्षेत्राला दुय्यम स्थान असल्याची खंत व्यक्त केली. शेतीतील इतर समस्यांना तोंड देत आपण पुढे आलो असलो तरी कृषी क्षेत्राखालील जमीन २० हजार हेक्‍टरने घटली आहे, असेही ते म्हणाले. 

आपल्या कृषी विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन सामान्यांपर्यंत पोचले नसल्याविषयी डॉ. एस. ए. पाटील यांनी चिंता व्यक्त केली. ‘अमेरिकेचे उत्पादन भारताच्या तिप्पट आहे. अन्नधान्याऐवजी आता दुग्धजन्य उत्पादनांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. संशोधन केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्ष अमलात आणावे, असेही ते म्हणाले. डॉ. के. व्ही. प्रभू यांनी शेती उत्पादनांच्या व्हेरायटीवर जोर देण्याची गरज व्यक्त केली. अनुदानातील अडचणी आणि त्यातील छुप्या तरतुदींवर कृष्णबीर सिंग चौधरी यांनी परखड भाष्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com