अजनी पोलिसांची चारधाम यात्रा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नागपूर : ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भय्यासाहेब धवड हे पत्नी वनितासह चार महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेण्याच्या नावाखाली अजनी ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःची चारधाम यात्रा करवून घेतली. पथक रिकाम्या हाताने परतल्याची माहिती आहे. "सकाळ'ने हे प्रकरण उचलून धरल्याने पोलिस आयुक्‍ताने ठाणेदार शैलेश संखे यांची बदली केली, हे विशेष.

ऍड. भय्यासाहेब बारकुजी धवड (62) व पत्नी वनिता (55) हे 28 जुलैला रात्री दहा वाजता ते जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजताच्या सुमारास ते बेपत्ता झाले. मुलाने अजनी पोलिस ठाण्यात आई-वडील मिसिंग झाल्याची तक्रार दिली. अजनी पोलिसांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक व खासगी वाहनांच्या थांब्यावर शोध घेतला. त्यानंतर तपास थंडबस्त्यात ठेवला. त्यामुळे विधी संघटना व प्रसारमाध्यमांनी पोलिसांच्या तपासावर आणि भूमिकेवर संशय घेतला होता.
वकिलांच्या संघटनांनी पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना निवेदन देऊन गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. जनमानसात अजनी पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे पोलिस आयुक्‍तांनी ठाणेदाराचे कान टोचले. त्यानंतर ठाणेदाराने पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलिस कर्मचाऱ्यांना ऍड. धवड दाम्पत्याच्या शोधात चारधाम यात्रेला पाठवले. धवड दाम्पत्याचा शोध घेतल्याचा दावा पथकाने केला. मात्र, आठ दिवसांच्या टूर नंतर पोलिस पथक रिकाम्या हाताने नागपुरात परतल्याची माहिती आहे.
पथकाचे संपले पैसे
तपासाच्या नावाखाली चारधाम यात्रेला गेलेल्या अजनीच्या पथकाला गंगटोक येथे ऍड. दाम्पत्याच्या शोधासाठी जायचे होते. मात्र, पथकाकडील पैसे संपले. त्यांनी अजनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पैसे संपल्याचे सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी पथकाला पैसे पाठविले नाही. त्यामुळे पथकानेही कोणतेही गांभीर्य न दाखवता शोधाशोध सोडून तडकाफडकी परत आल्याची चर्चा पोलिस ठाण्यात होती.

Web Title: Ajadhi police's Chardham yatra!