अजमेर ऊर्ससाठी सहा विशेष रेल्वे गाड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

अकाेला : अजमेर येथील ८०६ व्या ऊर्ससाठी विदर्भातील भाविक माेठ्या संख्येने जातात. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेने सहा विशेष गाड्या सुरू केल्या असून, यातील पहिली गाडी बुधवार २१ मार्च राेजी धावणार आहे. यासाठी खासदार संजय धाेत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे मागणी केली हाेती.

दरवर्षी अजमेर शरीफ करीता तसेच पुष्करला जाणाऱ्या भाविकांची गर्दी माेठ्या प्रमाणात असते. परंतु, यंदा अकोला खांडवा रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने हैदराबाद-अजमेर ही गाडी बंद आहे. भाविकांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सहा विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगाणा, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना अजमेर शरीफ आणि पुष्करला जाणे सोयीचे होणार आहे.

सहापैकी चार गाड्यांना अकाेला थांबा देण्यात आल्याने वऱ्हाडातील प्रवाश्यांना याचा लाभ हाेणार आहे. यामध्ये अकाेल्यासाठी गाडी क्रमांक ०७६४१ नांदेड ते अजमेर ही विशेष गाडी बुधवारी (ता.२१) नांदेड येथून सायंकाळी १६.०५ वाजता सुटेल. येथून पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अजमेर येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.२५ वाजता पोहोचेल. या गाडीत एकुण १८ डब्बे राहणार आहेत. तसेच गाडी क्रमांक ०७१२९ -०७१३० काचीगुडा ते अजमेर-मदार- काचीगुडा ही गाडी काचीगुडा येथून मंगळवारी (ता.२०) रात्री २३.३० सुटणार असून, अकोलामार्गे गुरुवारी (ता.२२) सकाळी १०.३० अजमेरला पाेहाेचेल, तर ११ वाजता मदार स्टेशनला पोहोचेल. विशेष गाड्या सुरू करण्यासाठी खासदार संजय धाेत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे मागणी रेटून धरली हाेती.

Web Title: ajamer ursa release special six railways