गोंदियातील अपघातग्रस्तांना अजितदादांचा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

नागपूर - तिरोडा (जि. गोंदिया) येथे जात असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपघातग्रस्त झालेली गाडी दिसली. पवार यांनी तात्काळ गाडी थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची तात्काळ व्यवस्थाही केली.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार गुरुवारी दुपारी नागपूरहून तिरोडा येथे जात होते. तिरोडा तालुक्‍यातील बिरसी फाटा येथे पवार यांचा ताफा आल्यानंतर काही वेळापूर्वी तेथे अपघात झाला होता. रस्त्यांवरून जाणारे एकही वाहन या ठिकाणी थांबत नव्हते.

मात्र, पवार यांना अपघातग्रस्त गाडी दिसल्यानंतर त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबविला. स्वतः गाडीतून उतरून जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. पवार यांच्या अंगरक्षकांनी त्यासाठी साहाय्य केले.
पवार यांनी पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांना या अपघाताची माहिती दिली; तसेच अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देशही दिले. पवार यांनी स्वतः थांबून मदत केल्याबद्दल जखमींनी कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: ajit pawar help to gondia accident affected