अखिल पोहनकरची युवा सेनेतून हकालपट्टी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

वाडी (जि.नागपूर) : ट्रकचालकाला अमानुष मारहाण करणारा अखिल पोहनकर याची युवा सेनेच्या नागपूर तालुका अधिकारीपदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई येथील शिवसेना भवनातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली. 

वाडी (जि.नागपूर) : ट्रकचालकाला अमानुष मारहाण करणारा अखिल पोहनकर याची युवा सेनेच्या नागपूर तालुका अधिकारीपदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई येथील शिवसेना भवनातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली. 
पोहनकर याने पदावर असताना वडधामना येथील गोदामात ट्रकचालक विक्की आगलावे याला अन्य सहकार्याच्या मदतीने अमानुष मारहाण केल्याची व्हिडिओ क्‍लिप प्रसारित होताच सर्वत्र घटनेचा निषेध करण्यात आला. ही क्‍लिप अनेक मित्र व परिचितांच्या ग्रुपवर व्हायरल करण्यात आली होती. ही बाब नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले. वाडी पोलिसांनी पोहनकर व त्याच्या साथीदारांना ताबडतोब अटकेची कारवाई केली. इकडे व्हिडिओ क्‍लिप वाडी परिसरात पसरल्याने सामान्य नागरिक, वाहतूकदार, शिवसेना, अन्य राजकीय पक्षांत निषेध व नाराजीचा सूर उमटला. अखेर ही गंभीर बाब मुंबई शिवसेना भवनातील युवा सेनेच्या मुख्यालयी पोहोचताच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी तातडीने प्रसारमाध्यम, व्हिडिओ क्‍लिप व नागपूर जिल्हा शिवसेना नेत्याचा अहवाल या आधारावर पोहनकर याने केलेले कृत्य अक्षम्य स्वरूपाचे असून युवा सेनेच्या शिस्त व नियमाविरुद्ध असल्याने त्याला नागपूर तालुका अधिकारीपदावरून पक्षातून हकालपट्टी करण्याचे निर्देश दिले. शिवसेना व युवा सेनेशी त्याचा कोणताही संबंध नसल्याची माहिती नागपूर तालुकाप्रमुख संजय अनासने यांनी एका प्रसिद्धिपत्रकातून दिली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Pohankar's expulsion from the Yuwa sena