सामाजिक आणि राजकीय प्रवाहात आणणाऱ्या ‘या’ दोन मित्रांच्या आठवणीने अमोल मिटकरी भावूक

विवेक मेतकर
Thursday, 14 May 2020

आयुष्याच्या  या वळणावर एक शिवछत्रपतीकडे नेणारा तर दुसरा संभाजी महाराजांकडे नेणारा असे दोन भाऊ जिवनात नसावेत ही कल्पना भयावह आहे, अशी भावूक पोस्ट मिटकरींनी केली आहे.

 

अकोला : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीपासून राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवश होत आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली. आयुष्याच्या  या वळणावर एक शिवछत्रपतीकडे नेणारा तर दुसरा संभाजी महाराजांकडे नेणारा असे दोन भाऊ जिवनात नसावेत ही कल्पना भयावह आहे, अशी भावूक पोस्ट मिटकरींनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी त्यांच्या दोन  जिवलग मित्रांसाठी एक फेसबुक पोस्ट केली आहे. जीवनाच्या सारीपाठातुन तुम्ही सोडुन गेलात मात्र तुमच्या प्रेमाला अमोल मिटकरी कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी त्यांच्या मित्रांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Image may contain: one or more people and outdoor

तुम्हाला आठवतोही अन् सावरतोही
साधारण 9 वर्षांपूर्वी अकोट मधील नंदिपेठ आणि सरस्वती शाळा इथूनच विवेक कोल्हे आणि तुषार दादा फुंडकर या दोघांनी मला सामाजिक आणि राजकीय प्रवाहात आणलं, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आज वडिलांना जितकं आठवतोय तितकाच तुमच्या आठवणीत एकटाच स्वतःला सावरतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Amol Mitkari is passionate about the memories of these two friends who brought him into the social and political stream