video: वित्तमंत्री मुर्दाबाद म्हणत बँक कर्मचारी रस्त्यावर

akola bank employees strike on the road
akola bank employees strike on the road

अकोला : आज क्या है हरताल है, आयबीए मुर्दाबाद, वित्तमंत्री मुर्दाबद असा नारा देत आज शहरातील शेकडो बँक कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने बँकेतील व्यवहार पूर्णता ठप्प झाले आहे. गांधी मार्गावरिल महाराष्ट्र बँकेसमोर कर्मचाऱ्यांच्यावतीने युनायटेड फोरमच्या नेतृत्वात शुक्रवार (ता.31) निदर्शने सुरू करण्यात आली आहेत.


20 टक्के वेतनवाढ त्वरित करावी यासह विविध प्रकारच्या 12 प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांनी बंदची हाक दिली आहे. सुमारे 500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा बंद मध्ये सहभाग आहे. आज सकाळी एमजीएम रोड स्थित महाराष्ट्र बँकेसमोर युनाटेड फोरमच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी वित्तमंत्री मुर्दाबादचे नारे दिले. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्याचा मोठा सहभाग दिसून आला. बँक कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने बँकेतील संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने नागरिकांना गौरसुविधेचा सामना करावा लागत आहे.

या बंद मध्ये सुनील दुर्गे, प्रवीण महाजन, अनिल मावळे, अनिल बेलोकर, लोडम, मोतलग, शेळके, मंगेश डांबरे, नवथळे, देशपांडे, लबडे, पाटील, मावंदे, गिरबिले, देशमुख, शुभांगी मानकर, प्राची वखरे, अंजली, देशपांडे, पूनम अग्रवाल, राणी अग्रवाल यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com