बँक कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून कामकाज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

बँक कर्मचाऱ्यांनी विविधी मागण्यांसाठी उद्यापासून बंद पुकारला आहे.  सरकार आणि शिष्टमंडळ यांच्यातील चर्चा विस्कटल्याने अकोल्यातील बँक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे.

अकोला : बँक कर्मचाऱ्यांनी विविधी मागण्यांसाठी उद्यापासून बंद पुकारला आहे.  सरकार आणि शिष्टमंडळ यांच्यातील चर्चा विस्कटल्याने अकोल्यातील बँक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे.

 बँक कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्यापासून तीन दिवस बँक बंदची हाक दिली. नुकतीच बँकेच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा झाली या चर्चेमध्ये कुठलेही आऊटपुट बाहेर न निघाल्याने कर्मचारी आपल्या बंदच्या मागणीवर ठाम आहेत. उद्यापासून तीन दिवस बँका बंद झाल्याने एटीएम मध्ये ठणठणाट जाणवणार आहे. तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये ही वाढ होणार असल्याचे पुढे येत आहे.

Image may contain: 8 people, people standing, outdoor and nature

टॉवर चौकातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील कर्मचाऱ्यांनी एसबीआय स्टाफ युनियनचे डेपोटी सेक्रेटरी सुनील दुर्गे यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून कामकाज करण्यास सुरुवात केलेली आहे शहरातील सुमारे 45 राष्ट्रीयकृत बँका या बंदमध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये 410 बँक कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे तसेच एक तारखेला स्थानिक एमजीएम रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने काढली जाणार आहे दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बँक कर्मचाऱ्यांच्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या जाणार आहेत अशी माहिती सेक्रेटरी सुनील दुर्गे यांनी सकाळशी बोलताना दिली. बँक कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामध्ये दाते, भागवत, अमोल गिरबीडे,  भावेश यादव, संतोष सोनोने, विवेक रावणकर, सुरेश बडे, अनिल वानखडे, कुरवाडे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Bank employees work with black stripes