esakal | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा या जिल्ह्यावर फोकस, आठवड्यात दुसऱ्यांदा घेतला शिवसेना जिल्हा प्रमुखांचा आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

akola Chief Minister Uddhav Thackeray's focus on Akola district, review of Shiv Sena district chief for the second time in a week

कोरोना विषाणू कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोल्यातील संख्या पाचशेच्यावर गेली आहे. मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक वेगाने अकोल्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी त्यांचा फोकस अकोल्यावर वाढवला आहे. एकाच आठवड्यात त्यांनी दुसऱ्यांदा शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून येथील स्थितीची माहिती घेतली व उपाययोजनांबाबत निर्देश दिले. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा या जिल्ह्यावर फोकस, आठवड्यात दुसऱ्यांदा घेतला शिवसेना जिल्हा प्रमुखांचा आढावा

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला   : कोरोना विषाणू कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोल्यातील संख्या पाचशेच्यावर गेली आहे. मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक वेगाने अकोल्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी त्यांचा फोकस अकोल्यावर वाढवला आहे. एकाच आठवड्यात त्यांनी दुसऱ्यांदा शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून येथील स्थितीची माहिती घेतली व उपाययोजनांबाबत निर्देश दिले. 


कोरोना विषाणू संसर्गाबाबत अकोल्यातील स्थिती विस्फोटक झाली आहे. यंत्रणाच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. गत पाच दिवसांतच 100 च्या वर रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच अकोल्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शिवसेना जिल्हा सचिव प्रदीप गुरुखुद्दे, शहर प्रमुख अतुल पवनीकर आदी पदाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री तातडीने बैठक घेवून उपाययोजनांसंदर्भात माहिती घेतली व आवश्यक ते निर्देश दिले. 
 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अडीच तास चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री 10 वाजता तातडीने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तब्बल अडीच तास म्हणजे मध्यरात्री 12.30 वाजतेपर्यंत ही मॅराथॉन बैठक सुरू होती. त्यात जिल्ह्यातील कोरोना विषाणूपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतच्या सर्व विषयांची सांगोपान चर्चा केली. 

रुग्ण संख्या शून्य हवी, जिल्हा प्रशासनाला निर्देश
अकोला शहरासह जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अकोला जिल्ह्यावर फोकस केला आहे. त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची व्हीसी घेतली. त्यात त्यांनी जिल्हाधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांना अकोला जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. उपाययोजना करताना पालकमंत्र्यांनाही या सर्वबाबींवर लक्ष ठेवण्याबाबत सूचित केले. 

मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टारांची मदत
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोल्यातील संख्या वाढतच आहे. संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आरोग्य विभागाला येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत गुरुवारी अकोला येथील आरोग्य विभागाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी व डॉक्टरांची चर्चा करण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

loading image