अरे देवा ! दुष्काळात तेरावा महिना; आग लागल्याने दोन कोटीचा कापूस जळून खाक

jining facotory.jpg
jining facotory.jpg

पातूर (जि. अकोला) : अकोला-पातूर रोडवरील चिखलगाव जवळील ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या संस्थेच्या सम्यक जिनिंग-प्रेसिंगला मंगळवारी (ता.26) सकाळी चार वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. आग कशामुळे लागली यासंदर्भात अजूनही चित्र अस्पष्ट आहे. यात सुमारे दोन कोटी रुपयांचा कापूस जळून खाक झाला. त्यामुळे याठिकाणची कापूस खेरदी अडचणीत आल्याने ती इतरत्र ठिकाणी वळविण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ॲड. आंबेडकरांनी घटनास्थळी भेट दिली व माहिती घेतली.

सकाळी पाच वाजतापासून चालू होते आग विझविण्याचे काम
उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे रात्री तापमान कमी असल्याने सदर फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम 48 स्पिन मशीनवर सुरू होते. कापूस वाहक पट्ट्यावर कापसातील दगडामुळे स्पार्किंग झाले असावे आणि त्यातूनच सदर आग लागली असावी असा अंदाज व्यवस्थापक भारती इंगळे तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात सीसीआयची महाव्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनूसार चार हजार क्विंटल कापूस, दोन हजार क्विंटल सरकी, 50 ते 60 कापसाच्या गठाणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.

असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. दुपारनंतर विमा कंपनी सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. घटनास्थळी प्रस्तूत प्रतिनिधीने भेट दिली असता सम्यक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधून प्रचंड प्रमाणात धूर निघत होता. आग विझवण्याचे काम पातूर नगरपरिषदेचा एक बंब आणि अकोला महानगरपालिकेचे दोन बंब आणि जिनिंग-प्रेसिंगचा एक ट्रॅक्टर ठेवण्याचे काम सकाळी 5.15 पासून करीत असल्याची माहिती व्यवस्थापक इंगळे यांनी दिली.

कापूस खरेदीचा ताण वाढणार
सहकारी तत्त्वावरील सम्यक जिनिंग प्रेसिंग हे अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे युनिट. याठिकाणी दहा ते अकरा हजार क्विंटल हून अधिक शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करण्यात आली होती. सदर फॅक्टरीला आग लागल्यामुळे येथील खरेदी आजपासून थांबली आहे. त्यामुळे कापूस खरेदीचा तान अधिक वाढणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सम्यक जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष प्रकाश उर्फे बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

सदर आगीमध्ये सम्यक जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, सर्वेक्षणाअंती किती नुकसान झाले समजू शकेल. सहकारी तत्त्वावरील संम्यक जिनिंग प्रेसिंग मध्ये सीसीआय द्वारा शेतकऱ्यांच्या कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती मात्र सदर फॅक्टरीला आग लागल्यामुळे येथील कापूस खरेदी आजपासून थांबवण्यात येत आहे. नजीकच्या कापशी आणि इतर केंद्राकडे ती वळती केली जाणार आहे असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com