कोरोना पोहोचला स्त्री रुग्णालयात, प्रसुती झालेली महिला पॉझिटिव्ह : संपर्कात आलेल्यांची होणार तपासणी

akola corona arrives at the women's hospital, the woman gave birth positive: those who came in contact will be examined
akola corona arrives at the women's hospital, the woman gave birth positive: those who came in contact will be examined

अकोला : अकोल्यात कोरोनाचे संकट दिवसंदिवस चांगले गडद होत आहे शहरातील विविध भागात हातपाय पसरणाऱ्या कोरोनाने चक्का आता जिल्हा स्त्री रुग्णालयात ही एंट्री घेतली असून येथील एका प्रसूती झालेल्या महिलेला कोरोना ची लागण झाली आहे. काही दिवसात लेडी हार्डिंग मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


जिल्ह्यात एकमेव असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयाची आतापर्यंत ची वाटचाल कोरोनामुक्त अशीच होती मात्र गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात एक प्रसूती झालेली महिला पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोना ने जिल्हा स्त्री रुग्णालयात एन्ट्री घेतल्याचे दिसून आले हळूहळू ही संख्या वाढते की काय अशी भीती आता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

चार नातेवाईकांसह संपर्कात आलेले चार जणांची तपासणी 
लेडी हार्डिंगमध्ये आढळून आलेल्या एका महिला रुग्णांच्या संपर्कात आलेले तिचे चार नातेवाईक आणि त्या महिलेच्या बेड शेजारी असलेल्या चार महिला असे एकूण ८ रुग्णांना तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. आता यापैकी किती जणांचे किती अहवाल पॉझिटिव्ह येतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तीन परिचारिका क्वारंटाईन
जी महिला पॉझिटिव्ह आढळली त्या महिलेची प्रसुती करण्यासाठी तीन नर्सनी मदत केली होती. त्या तीन परिचारिकानाचे विलगिकरण करण्यात आलेले आहे.

मातेच्या प्रकृतीनुसार बाळाला स्तनपान
लेडी हार्डिंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जन्मलेल्या नवजात बाळाला स्तनपान हे त्या बाळाच्या आईच्या प्रकृतीवर अवलंबून असणार आहे. जर त्या आईची तबेत नॉर्मल असली तर योग्य ती खबरदारी घेऊन स्तनपान केले जाणार आहे. अन्यथा इतर पर्याय अवलंबवावे लागतील, अशी माहिती देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com