
Akola Crime : १५ छायाचित्रकारांचे कॅमेरे नेले भाड्याने, परत दिलेच नाही! आरोपीविरोधात तक्रार
अकोला : डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मनोरथ कॉलनीतील रहिवासी सनी तेलगोटे याने अकोल्यातील १५ ते १६ छायाचित्रकारांचे व्हिडीओ कॅमेरे भाड्याने नेले. त्यानंतर ते अद्यापपर्यंत आणून दिले नाही.
त्यामुळे शैलेस जनार्दन खंडारे यांच्यासह कॅमेरा देणाऱ्या छायाचित्रकारांनी शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीत खंडारे यांच्या अडीच लाखांच्या कॅमेऱ्यासह इतरही कॅमेऱ्यांचे एकूण १५ लाख रुपये किंमत आहे. तेलगोटे विरोधात डबकी रोड, जुने शहर, सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या आहेत.
पोलिसांनी अद्याप शोध घेतला नाही. त्यामुळे मंगळवारी खंडारे यांनी पुन्हा सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. आरोपीला लवकरात लवकर शोधून काढावे व कॅमेर पतर मिळावे, विनंती तक्रारीत करण्यात आली आहे. कॅमेरे नसल्याने छायाचित्रकारांचे व्यवसाय ठप्प झाले आहे व त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.