esakal | लॉकडाउनमध्येही नागरिकांनी नाकारले शिवभोजन, किंमत कमी असूनही घटली विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

 akola even in the lockdown, citizens refused Shivbhojan, despite the low price, sales fell

शिवभोजन पॅकेट्सकडे गरजूच पाठ फिरवत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निश्‍चित उद्दिष्टापैकी कमीच थाळ्यांची विक्री होत आहे. परिणामी प्रतिदिवशी ८००-९०० थाळ्यांची विक्री होत नसल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाउनमध्येही नागरिकांनी नाकारले शिवभोजन, किंमत कमी असूनही घटली विक्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे, अशा मंडळींना सहज जेवळ उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी शिवभोजन थाळींची (पॅकेट्स) संख्या तीन हजार केली होती.

परंतु शिवभोजन पॅकेट्सकडे गरजूच पाठ फिरवत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निश्‍चित उद्दिष्टापैकी कमीच थाळ्यांची विक्री होत आहे. परिणामी प्रतिदिवशी ८००-९०० थाळ्यांची विक्री होत नसल्याचे दिसून येत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्यायेवजी वाढत जात आहेत. संसर्गातून होणाऱ्या या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावरुन विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु या काळात पोटावर हात असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यासोबतच बाहेरगावावरुन आलेल्या नागरिकांना सुद्धा उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने गरिब नागरिकांसाठी सुरु केलेल्या शिवभोजन थाळींचे लक्षांक प्रतिदिवशी ६०० वरुन तीन हजार केले आहे. वाढलेला इष्टांक पाहता महानगरासह तालुक्यांत नव्याने शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यासोबतच थाळीची किंमत सुद्धा पाच रुपये करण्यात आली आहे. त्यानंतर सुद्धा गरजू नागरिक शिवभोजनकडे पाठ फिरवत आहेत.

विक्री केंद्रांवर शुक्रवारी झालेली विक्री
हिरो होंडा शोरूम समोर बार्शीटाकळी (५१ थाळी), पोलिस स्टेशन समोर बार्शीटकाळी (६६ थाळी), मंगरूळपीर रोड खोलेश्‍वर रोड बार्शीटाकळी (८४ थाळी), शासकीय विश्रामगृहासमोर तेल्हारा (२६० थाळी), बस स्थानकाजवळ अकोट (१८१ थाळी), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला (८५९ थाळी), कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला (४२१ थाळी), लेडी हार्डींग अकोला (७० थाळी), बस स्थानकाजवळ बाळापूर (१४० थाळी), जुने बस स्थानकाजवळ पातूर (२२ थाळी) या ठिकाणी शिवभोजन थाळींची विक्री करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून प्रतिदिवस तीन हजार शिवभोजन थाळींची (पॅकेट्स) विक्री करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. परंतु सदर विक्री एकाच ठिकाणी न करता फिरत्या स्वरुपात करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्याचा किंचीत परिणाम थाळी विक्रीवर होत आहे.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला 

loading image