esakal | ...अखेर हा जिल्हा रेड झोनमध्ये गेलाच!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola finaly got in to red zone of corona virus

तीन दिवसांत नव्याने अकारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने अकोला जिल्हा कोरोना विषाणू बाधित जिल्ह्यांच्या यादीत रेड झोनमध्ये आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 14 जिल्हे रेड झोनमध्ये आले आहेत. त्यामुळे 3 मेनंतर पुन्हा लॉकडाउन वाढण्याची शक्यता आहे. 

...अखेर हा जिल्हा रेड झोनमध्ये गेलाच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः कोरोना विषाणू बांधित रुग्णांची संख्या राज्यात वाढतच आहे. त्यातच आतापर्यंत रुग्णसंख्या नियंत्रित असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये मागिल तीन दिवसात अकरा नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे ऑरेंड झोनमधून अकोला जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना बाधित जिल्ह्यांची रुग्ण संख्येवरून जाहीर केलेल्या यादीत अकोल्याचा दहावा क्रमांक आहे.

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बांधित रुग्णांचे 28 अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 14 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तीन रुग्ण मृत असून त्यातील एकाने आत्महत्या केली आहे. इतर अकरा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपाचार घेत असलेल्या 14 रुग्णांपैकी 11 रुग्ण हे गेले तीन दिवसांत आढळून आले. 28 एप्रिला चार रुग्णांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. 29 एप्रिल रोजी एका मृत महिलेसह पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 30 एप्रिलला त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली. 

संसर्गातून रुग्ण वाढल्याने रेड झोनमध्ये
अकोला जिल्ह्यात 28 एप्रिलपूर्वी आढलेल्या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री ही बाहेर जिल्ह्यातील होती. त्यामुळे समूह संसर्गाची बाधा अकोल्यात झाली नव्हती. मात्र गेले तीन दिवसांत आढळेल्या रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. त्यांना येथे संसर्गातून विषाणूचा बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. समूह संसर्गासोबतच रुग्ण संख्या वाढत असल्याने अकोला जिल्हा कोरोना बांधित 14 जिल्ह्यामध्ये आला आहे. देशात एकूण 733 रेड झोन आहेत. त्यात अकोल्याचा 378 वा क्रमांक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवीन रेड झोनची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

ही आहेत राज्यातील रेड झोन क्षेत्र

 • मुंबई
 • मुंबई उपनगर
 • पुणे
 • ठाणे
 • पालघर
 • नाशिक
 • नागपूर
 • यवतमाळ
 • सोलापूर
 • अकोला
 • औरंगाबाद
 • सातारा
 • धुळे    
 • जळगाव

  1 मे रोजीचा रिपोर्ट नील
  अकोला जिल्ह्यातील सहा संशयित रुग्णांचे अहवाल 1 मे रोजी सकाळी प्राप्त झाले. हे सहाही अहवाल निगेटिव्ह आल्याने सलग तीन दिवसांच्या धक्क्यांनंतर 1 मे रोजी अकोल्यात कोरोना बांधित रुग्ण संख्येचा रिपोर्ट नी आल्याने दिलासा मिळाला आहे.