संचारबंदीतही विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे धडे

akola girls iti study from home online classes
akola girls iti study from home online classes

अकोला. कौशल्य विकास विभागांतर्गत येणाऱ्या आयटीआयच्या परीक्षा या जुलै महिन्यात होत असतात. मात्र परीक्षेपेक्षाही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. अकोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे प्रशिक्षणार्थ्यांसाठी अभ्यासासाठी स्टडी फ्रॉम होम हा ऑनलाईन उपक्रम उत्तम पर्याय ठरत आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण देणारा कौशल्य विकास विभाग याबाबतीत दुसरा पर्यायी मार्ग निवडताना दिसत आहे.  याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) प्राचार्य भंडारे म्हणाले, संस्थेतील निदेशक व्हॉटस्‌ऍप ग्रुप्सच्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद ठेवत आहेत. विविध चाचणी परीक्षा, यूट्यूब, भारत स्किल्स अॅप, याद्वारे हा उपक्रम अविरतपणे राबविला जात आहे. 

आयटीआय मुलींची, अकोला येथील एकूण दहा व्यवसायांच्या निदेशकांनी त्यांचे व्यवसायानुरुप प्रशिक्षणार्थींनींचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले असून माहितीची आदान-प्रदान द्वारे प्रशिक्षण सुरू आहे. संस्थेच्या एकुण आठ शिल्प निदेशकांनी त्यांचे व्यवसायानुरुप व्हिडिओ क्लिपची निर्मिती केली आहे. डीव्हीइटी  ई -लर्निंग चॅनेलवर प्रसारणासाठी पाठविलेली आहेत. संस्थेचे गट निदेशक व सर्व निदेशक आपापल्या परीने  ऑनलाइन  व  ई - प्रणालीच्या माध्यमातून  प्रभावीपणे  प्रशिक्षण  देत असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी दिली आहे.

असा आहे उपक्रम
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाच्या अनुसरून माहिती देणे, बहुपर्यायी  प्रश्नपत्रिकेत द्वारे  चाचणी परीक्षा घेणे, शैक्षणिक व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणे, प्रश्ननांची उत्तरे आणि विद्यार्थ्यांचे समाधान करणे, प्रशिक्षणार्थ्यांचे मनोधैर्य वाढविणे यासह त्याच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे आदी बाबींचा या उपक्रमात समावेश आहे.

ऑनलाईन अभ्यासाला विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद
 क्‍लासमार्कर्स, टेस्ट मॉझ सारख्या अद्ययावत वेबसाइट्‌सचा वापर करून मुलांच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. प्रचलित खडू आणि फळा याऐवजी यूट्यूब आणि गुगल वरील ज्ञानाचा खजिना मुलांच्यासमोर ठेवला जात आहे. या पद्धतीस मुलांचा देखील उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com