सूर्य आग ओकतोय; महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान अकोल्यात

विवेक मेतकर 
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अकोला : उष्णतेच्या लाटेत अकोल्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी खरगोननंतर देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली. जणू काही सूर्य अकोल्यात आग ओकतोय असा भास होत असून, गुरुवारी अलिकडच्या काळातील सर्वाधिक म्हणजे 46.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अकोला : उष्णतेच्या लाटेत अकोल्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी खरगोननंतर देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली. जणू काही सूर्य अकोल्यात आग ओकतोय असा भास होत असून, गुरुवारी अलिकडच्या काळातील सर्वाधिक म्हणजे 46.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 24 एप्रिलपासून विदर्भात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आला. तापमान 45 अंश सेल्सिअस पुढे पोहोचले होते. देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अकोल्याची नोंद झाली होती. बुधवारी 45.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेल्यानंतर तापमान वाढीचा हा जोर दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. तापमानाचे सर्व उच्चांक गाठत अकोल्यात गुरुवारी 46.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविल्या गेले. गतवर्षी मेमध्ये अकोल्यात सर्वाधिक 47 अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले होते.

दोन ठिकाणी वेगवगेळ्या नोंदी
अकोला शहरात जिल्हाधिकारी कार्यलय परिसरात असेले भारतीय हवामान खात्याचे कार्यालय आणि शहरालगत असलेल्या डॉ.पंजबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरातील कुलगुरू कार्यालयापर्यंतचे अंतर चार किलोमीटर आहे. या दोन्ही ठिकाणी तापमानाची नोंद होते. मात्र दोन्ही ठिकाणी दोन दिवसात तापमानाच्या वेगवेगळ्या नोंदी झाल्या असून, यात किमान 2 ते 3 अंशाचा फरक नोंदविल्या गेला.

या आठवड्यातील हवामान खाते व डॉ.पंदेकृवितील तापमानाच्या नोंदी
वार              हवामान  खाते    डॉ.पंदेकृवि फरक
सोमवार          42.4                41.0           1.4
मंगळवार        43.4                41.2           2.2
बुधवार           45.1                42.5           2.6
गुरुवार           46.3                 43.6          2.7

 

Web Title: Akola has Recorded Highest Temperature In Maharashtra