CoronaVirus: गर्दी टाळण्यासाठी व्यापारी संघटनांनी घेतला हा निर्णय!

akola market stop for CoronaVirus
akola market stop for CoronaVirus

अकोला : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही बाजारपेठेतील गर्दी कायम आहे. त्यातच सूर्यास्तानंतर बाजारपेठेत होणारी ग्राहकांची गर्दी अधिक असल्याने 31 मार्चपर्यंत बाजारपेठ सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरू ठेवण्यात येणार आहे. महानगरपालिका प्रशासन आणि विदर्भ चेंबरच्या नेतृत्वात सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने थेट व्यापाऱ्यांनाच आवाहन करीत बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विदर्भ चेंबर व सर्व व्यापारी संघटनांच्या सदस्यांसोबत गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी दिली. आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर शुक्रवार, ता. 20 मार्च ते 31 मार्च या कालावधित बाजारपेठीतल सर्व दुकाने सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तर हॉटेल रात्री ८ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचा निर्णय सर्वानुमताने घेण्यात आला. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासनही व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीला चेंबरचे अध्यक्ष राजकुमार बिलाला, वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन खंडेलवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव विवेक डालमिया, सहसचिव राहुल गोयनका, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया, चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक गुप्ता, वसंत बाछुका, विजय पनपालिया, कमलेश वोरा, रमाकांत खंडेलवाल, निरंजन अग्रवाल, चेंबरच्या कार्यकारिणीचे सदस्य, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.  

लिलाव बंद 
भाजीबाजारातील लिलाव बंद ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका बाजार विभागाच्या वतीने व्यापारे व अडते यांना देण्यात आले. किरकोळ भाजीची दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र त्यांनाही वेळ निर्धारित करून देण्यात आली आहे. शिवाय ग्राहकांचा मालाशी संपर्क येणार नाही, हात स्वच्छ धुण्याकरिता प्रत्येक व्यापाऱ्याने व्यवस्था करावी, मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मनपाच्या मुख्य द्वारावरच तक्रारी स्वीकारणार
महानगरपालिकेत नागरिकांनी येण्याचे शक्‍यतोवर टाळावे. नागरिक लेखी समस्‍या घेऊन येतील त्‍यांच्‍या समस्‍या स्वीकारण्‍याची व्‍यवस्‍था महापलिकेच्‍या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश व्‍दारावरच केलेली असल्याची माहिती आयुक्‍त संजय कापडणीस यांनी दिली आहे.

या उपाययोजनांवरही भर 
शहरातील मॉल, होटेल्‍स, मंगल कार्यालये, लॉन आदी मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांनी नागरिकांची गर्दी होऊ नये याची काळजी घ्‍यावी.
व्‍यावसायिक प्रतिष्‍ठान, होटेल व रेस्‍टॉरेंट व्‍यावसायिकांनी आपल्‍या  प्रतिष्‍ठानातील ए.सी. बंद ठेवावेत.
उघड्यावर मांस विक्रीला बंदी घलण्‍यात आली असून आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई 
रस्‍त्‍यालगत खाद्य पदार्थांची उघड्यावर विक्री करण्‍यासही बंदी घालण्‍यात आली 
शहरातील बगीचे बंद करण्‍यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com