नगरसेविकेचे महापालिका प्रशासनाला आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

दररोज टॅक्टरने उचलण्यात यावा कचरा
कचरा कुंडी तोडल्यानंतरही नागरिक रस्त्यावर कचरा टाक आहे. तो कचरा दररोज टॅक्टर लावून उचलण्यात यावा, असा आग्रह प्रभागातील नगरसेवकांनी धरला.

अकोला : शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न पावसाळ्यापूर्वीच उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. प्रभागातील कचरा उचला जात नाही आणि कचरा कुंडी प्रशासनाकडून तोडून टाकण्यात आल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका मंजुषा शेळके यांनी शहरातील कचरामुक्त प्रभाग दाखवा, असे आव्हानच मनपा प्रशासनाला दिले.

शहरात कचरा संकलनासाठी घंडा गाड्या लावल्यानंतरही कचरा संकलनाचे काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा कचरा कुंडीकडे वळावे लागत आहे. कचरा कुंडीत टाकल्या जात असल्यामुळे रस्त्यावर कचरा दिसू लागला आहे. परिणामी प्रशासनाकडून कचरा कुंडीच तोडून टाकण्यात आली. जुने शहरातील प्रभाग १० मधील श्रीवास्तव चाैकात दोन लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली कचरा कुंडी तोडण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविकेने रमजान महिन्यात पावसाळ्यापूर्वी करचा कुंडी तोडल्याचा आरोपही नागरिकांनी केला. त्यामुळे नगरसेविकेने स्थायी समिती सभेत प्रशासनाला कचरा कुंडी उचलण्याबाबत जाब विचारला. प्रशासनाकडून रस्त्यावर कचरा होत असल्याचे कारण देण्यात आले. वास्तविक रस्त्यावर टाकला जात असलेला कचरा नियमित उचलण्यात येत नसल्याबाबत सूचना देऊनही तो उचलण्यात आला नाही, याकडे शेळके यांनी लक्ष वेधले. कचरा कुंडीच नको, घंडा गाडीत कचरा टाका, असा आग्रह पश्‍चिम झोनचे क्षेत्रिय अधिकारी दीपकुमार शेजव यांनी धरला. त्यावर संतप्त झालेल्या नगरसेविका शेळके यांनी शहरातील एक प्रभाग दाखवा जो पूर्ण स्वच्छ आहे, असे आव्हानच प्रशासनाला केले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नमते घेवून नियमित कचरा संकलनासाठी गाड्या पाठविण्याची व्यवस्था करण्याचे मान्य केले.

दररोज टॅक्टरने उचलण्यात यावा कचरा
कचरा कुंडी तोडल्यानंतरही नागरिक रस्त्यावर कचरा टाक आहे. तो कचरा दररोज टॅक्टर लावून उचलण्यात यावा, असा आग्रह प्रभागातील नगरसेवकांनी धरला.

पाणीशुद्धतेसाठी 49 लाख खर्च
अकोला शहराला शुद्ध पाणी पुरविण्याचा खर्च ४८ लाख ७६ हजार ४५० एवढा आहे. पाणीशुद्धतेसाठी आवश्‍यक पीएससी व ब्लिचिंग पावडर पुरवठ्याकरिता निविदा स्वीकृत करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

कुत्र्यांचे निर्बिजिकरण सुरू
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन विभागाच्या चिकित्सा विभागातील तज्ज्ञांकडून कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यात येणार आहे. या कामावर प्रशासनाने लक्ष ठेवून खोटे देयके काढेले जाणार नाही, असे याची दक्षता घेण्याची सूचना नगरसेवकांनी केली.

Web Title: Akola municipal corporater problem