भूमिगत केबल प्रकरणात मनपाची बनवाबनवी!

cable Japti
cable Japti

अकोला : महापालिका क्षेत्रात टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल प्रकरणात महापालिकेकडून बनवाबनवीचा खेळ सुरू आहे. अधिकारी आणि पदाधिकारी कागदी घोडे नाचविण्यात दंग असून, त्याचा फायदा घेत मोबाईल कंपन्यांकडूनही पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.


भूमिगत केबल टाकताना एका कंपनीने परवानगी घेतली. त्यात इतर कंपन्यांनीही त्यांचे केबल टाकले. ही बाब उघड झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाईची अपेक्षा होती. मात्र मनपा प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविण्याचा खेळ सुरू करण्यात आला. ज्या कंपन्यांनी परवानगी न घेता केबल टाकले, त्याच कंपन्यांकडे त्यांनी टाकलेल्या भूमिगत केबलची माहिती मागण्यात आली. काही कंपन्यांनी त्यांची माहिती मनपाकडे सादर केली. मात्र ती अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला माहिती तपासण्यात अडथळे येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस या प्रकरणात हा कागदी खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे.


अद्याप नोटीस नाही
मनपाने झोननिहाय केलेल्या सर्व्हेक्षनानंतर अवैध केबलचे जाळे आढळून आले होते. त्यानंतर तातडीने मनपा प्रशासनाकडून कंपन्यांना नोटीस बजावणे अपेक्षित होते. मात्र महिना उलटला तरी कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात अधिकारी व मनपाचे तत्कालीन पदाधिकारीही संशयाच्या भौवऱ्यात सापडले आहे.


अवैध टॉवरचे करणार चार भाग
शहरात असलेल्या २२८ मोबाईल टॉवरपैकी २२० अवैध टॉवर असल्याचे उघडकीस आले होते. या टॉवरवर दंडात्मक कारवाईची अपेक्षा असताना अद्याप त्यांना नोटीसही बजावण्यात आल्या नाहीत. आता अवैध टॉवर चार भागात विभाजन्यात येणार आहे. त्यानंतर नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.


महासभेपुढे जाण्याचा घाट
मोबाईल केबल प्रकरणात कारवाईला विलंब होत असतानाच आता हे प्रकरण मनपाच्या सर्वसाधारण सभे पुढे नेण्याचा घाट घातला जात आहे. महासभेपुढे प्रकरण ठेवून यात कारवाई टाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता मनपातील विरोधी पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.


या भागातील केबल कापले
महापालिकेच्‍या विद्युत विभागाव्‍दारे शहरातील अशोक वाटिका चौक, मेन हॉस्‍पिटल रोड, दक्षता नगर चौक, लक्‍झरी बस स्‍थानक चौक, गुडधी रोड मोठी उमरीपर्यंतच्‍या रस्‍त्‍यावरील बिना परवानगीने मनपा पथदिवेंच्‍या खांबावर लावण्‍यात आलेले विविध कंपनीचे नेटचे तसेच स्‍थानिक केबल नेटवर्कचे केबल कापून जप्‍त करण्‍यात आले.

.
एकीकडे केबल तोडले, दुसरीकडे जोडले
महापालिका प्रशासनाकडून शहरात विद्युत खांबांवर टाकण्यात आलेले केबल एकीकडे तोडण्यात येत आहे. दुसरीकडे कंपन्या हे केबल जोडत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळपासून शहरातील काही भागात आयडीया कंपनीचे मोबाईल बंद होते. दुपारनंतर ते सुरू झाले. त्यानंतर रिलायन्स जीओ कंपनीचे मोबाईल बंद झाले. यावरून कंपन्यांची बनवाबनवी उघड होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com