कत्तलीसाठी नेण्यात येणारी 30 गोवंश ताब्यात

अनिल दंदी
शनिवार, 24 मार्च 2018

अकोला : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 30 जणावरांना ताब्यात घेऊन सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई बाळापूर पोलिसांच्या हद्दीत पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपूरे यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे.

आज (शनिवार) एमएच 30 एबी 994 क्रमाकांच्या महेंद्र पिकअप वाहनाद्वारे कत्तली करीता ९ गौवंश नेत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने आज पाहटेच्या सुमारास व्याळा नजीक महामार्गावर सापळा रचला.

दरम्यान, यावेळी महिन्द्रा पिकअप मध्ये नऊ गोवंश पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी दोन जणांना रंगेहात अटक करण्यात आली. शेख फिरोज शेख दाऊद, शेख. मुश्ताक मोहम्मद याकूब असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. गंगा नगर येथील रहिवासी गुल मोहम्मद शेख बाबू उर्फ गुल्लु याला घटनास्थळाहुन पसार झाला आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून मोटर वाहनांसह तब्बल साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्या आरोपिंची कसून चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना कान्हेरी (गवळी) शेतशिवरातील सुभाष तेलगोटे  यांच्या शेतात गोदाम बांधून त्यामध्ये कत्तली करिता गोवंश ठेवल्या जात असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या विशेष पथकाने तेथे छापा टाकून अडीच लाख रुपये किमतीचे 21 गोवंश ताब्यात घेतले. गुल मोहम्मद शेख बाबु उर्फ गुल्लु नामक इसम गौवंशाची वाहतूक करीत असल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगीतले.

कान्हेरी व व्याळा येथून 30 गोवंशासह सात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. हि कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपूरे व पथकाने केली.

Web Title: akola news 30 cows taken for slaughter