अकोला : ट्रक नदीत पलटी होऊन 2 जण ठार

योगेश फरपट
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

बुधवारी सकाळी 11 वाजता खामगावजवळील टेंभुरना जवळ ट्रकची अँपेला धडक बसून 4 ठार तर 6 जखमी झाले होते. आज पहाटे सुद्धा राष्ट्रीय महामार्गावर अकोल्यापासून 15 किलोमीटर अंतरावरील काटेपुर्णा नदीच्या पुलावरून 2 ट्रकमध्ये अपघात झाला.

अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील काटेपुर्णा नदीत ट्रक पलटी होऊन दोघे जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी (ता.17) सकाळी 4 वाजता घडली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची ही दुसरी घटना आहे. 

बुधवारी सकाळी 11 वाजता खामगावजवळील टेंभुरना जवळ ट्रकची अँपेला धडक बसून 4 ठार तर 6 जखमी झाले होते. आज पहाटे सुद्धा राष्ट्रीय महामार्गावर अकोल्यापासून 15 किलोमीटर अंतरावरील काटेपुर्णा नदीच्या पुलावरून 2 ट्रकमध्ये अपघात झाला.

त्यात ट्रक पुलावरून खाली कोसळले. यामध्ये दोघे जागीच ठार झालेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करीत आहे.

Web Title: Akola news accident near akola 2 dead