गोरक्षण रोडसाठी ‘महायज्ञ’ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

गोरक्षण रोडचे सध्या काम सुरू आहे. परंतु, ते सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. येथे वाळू एेवजी चुरीचा वापर करण्यात येत आहे. वाळू न वापरता, पाणी न मारता, खोदकाम न करता या रस्त्याचे काम सुरू आहे. समर्थ संघटनेनी कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना लेखी स्वरुपात निवेदन सुध्दा देण्यात आले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही

अकोला - रेती न टाकता, पाणी न मारता, खोदकाम न करता, होत असलेल्या गोरक्षण रोड मध्ये प्रचंड त्रुटी असून नियमानुसार रस्त्याची उंचीसुध्दा नाही. या रस्त्याला फक्त देव टिकवू शकते, देवाला प्रसन्न करण्यासाठी ‘होमहवन’ हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. 

गोरक्षण रोडचे सध्या काम सुरू आहे. परंतु, ते सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. येथे वाळू एेवजी चुरीचा वापर करण्यात येत आहे. वाळू न वापरता, पाणी न मारता, खोदकाम न करता या रस्त्याचे काम सुरू आहे. समर्थ संघटनेनी कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना लेखी स्वरुपात निवेदन सुध्दा देण्यात आले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. समर्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारासुध्दा दिला होता. या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. हे उघडपणे सामान्य नागरिकांच्या लक्षात येत आहे. परंतु, आपल्याला काय करायचं, काय फरक पडतो या विचारपध्दतीमुळे प्रत्येक कामाकडे दुर्लक्ष केले जाते. अधिकाऱ्यांनी कामाचे साधे फलक सुध्दा लावलेले नाही. समर्थ संघटना जेव्हा या अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार घेऊन गेली तेव्हा उलट या अधिकाऱ्यांनी आपण कायदा हातात घेऊ नका. तुम्हीजर आंदोलन केले तर आम्ही तुमच्या संघटनेवर पोलिस कारवाई करू अशी धमकी दिल्या गेली. या रस्त्याची उंची सुध्दा कमी-जास्त आहे. या रस्त्यामध्ये खुप भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप करित समर्थ संघटनेने शांतीच्या मार्गाने ‘महायज्ञ’ आंदोलन गोरक्षण रोडवर आज (ता.२) केले.

हे आंदोलन समर्थ संघटनेचे शहर अध्यक्ष संग्राम मोहोड यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यांच्यासोबत चंद्रकांत काळे, सचिन हागे, शिवाजीराव ताले, सचिन विनकरे, सागर तायडे, अभिषेक खंडारे, विकास भोंडे, राहूल यादव, सागर देवकते, शुभम ठाकरे, शिवम शेंडे, अक्षय हरणे, संजय यवतकर, गोपाल टाले, चिकु ढोरे, ऋषीकेश शेलार, अभिजित खंडारे, प्रबोधन इंगळे, पवन अवताडे, भुषण शिंदे, श्रीकांत भालतिलक, आकाश गिरी, नितेश शुक्ला, शिव ठाकरे, अक्षय नागापूरे, अक्षय पवार, सुनिल अंजनकर, अजय बोराळे, प्रतिक वानरे, सुनिल दाते, प्रदिप मते, विकास भोंडे, सन्नी तायडे, सतीश दाते, जीवन जगताप यासह संघटनेचे बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: akola news: agitation vidarbha