कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव; कीटकनाशकांचा मुद्दा गाजला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

‘बळी’ ठरलेल्यांना एक लाखांची मदत द्या! 
कीटकनाशांच्या फवारणीमुळे जिल्ह्यात मुत्यूमुखी पडलेल्या सात शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषदतर्फे एक-एक लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पांडे गुरुजी यांनी सभेत मांगला. त्याचप्रमाणे गाेपाल काेल्हे यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी याेजनेला व विहिरिंच्या याेजनेला सरकारद्वारे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देवून महापुरुषांची थट्टा करण्यात येत असल्याच्या मुद्दा लावून धरला.

अकाेला : पुणे येथील कृषी विभागाच्या पथकाने कीटकनाशकांचा १४ काेटी रुपयांचा अनधिकृत साठा जिल्ह्यातील विविध गाेदामांतून जप्त केला. परंतु जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी, अशा प्रकारची काेणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या व संबंधित गाेदाम मालक, कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी (ता. १३) जि.प. स्थायी समितीची सभा गाजली. 

जिल्हा परिषदच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात शुक्रवारी (ता. १३) स्थायी समितीची सभा आयाेजित करण्यात आली. सभेमध्ये २० सप्टेंबर राेजी झालेल्या समितीच्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघाेडे यांच्या परवानगीने विषय सूचिवरील एक व वेळेवर येणारे सात विषयांचे ठराव मांडण्यात आले. सभेच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ सदस्य विजय लव्हाळे यांनी बीडीआेंच्या अनुपस्थितीचा मुद्द्यावर उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यावर जिल्हा परिषदचे सीईआे एस. राममूर्ती यांनी सभेत अनुपस्थित बाळापूरचे बीडीआे शिंदे यांना शाे-कॉज नाेटीस देण्याची सूचना केली. 

जिल्हा परिषद सदस्य गाेपाल काेल्हे यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्या पथकाने तीन दिवस जिल्ह्यातील विविध गाेदामांची तपासणी करून १४ काेटी ३१ लाख रुपयांचे कीटकनाशक जप्त केल्याच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केला. परंतु जिल्हा परिषदच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील अनधिकृतरित्या गाेदामात ठेवलेल्या कीटकनाशकाच्या साठ्यावर काेणत्याच प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या संंबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर यवतमाळच्या धर्तीवर कारवाई करण्याचा तथा कीटकनाशक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुद्द्यावरून कृषी विभागाचे अधिकारी हनुमंत ममदे यांना काेंडीत पकडले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी कीटकनाशकाच्या मुद्द्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी कीटकनाशक ठेवण्यासाठी गाेदाम देणाऱ्यांवर व संबंधित कंपन्यांवर कृषी विभागाने काय कारवाई केली, याचा जाब विचारला. परंतु कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी संबंधितांवर कारवाई करू, कंपनी व गाेदाम मालक दाेषी आढळल्यास पाेलिसात तक्रार देवू, अशा प्रकारची उत्तरे दिली. सभेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघाेडे, उपाध्यक्ष जमीर उल्ला खान पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राममूर्ती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समाजकल्याण सभापती रेखा अंभाेरे, महिला बाल कल्याण सभापती देवकाबाई पाताेंड, शिक्षण सभाती पुंडलीकराव अरबट, इतर जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते. 

‘बळी’ ठरलेल्यांना एक लाखांची मदत द्या! 
कीटकनाशांच्या फवारणीमुळे जिल्ह्यात मुत्यूमुखी पडलेल्या सात शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषदतर्फे एक-एक लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पांडे गुरुजी यांनी सभेत मांगला. त्याचप्रमाणे गाेपाल काेल्हे यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी याेजनेला व विहिरिंच्या याेजनेला सरकारद्वारे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देवून महापुरुषांची थट्टा करण्यात येत असल्याच्या मुद्दा लावून धरला.

निमशासकीय शिक्षकांवर कारवाई करू नका! 
सभेत शिक्षण विभागाच्या बिंदुनामावलीच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करत पांडे गुरुजी यांनी शासनाच्या आदेशाने कायम करण्यात आलेल्या वस्तीगृहांच्या निमशासकीय शिक्षकांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली.

Web Title: Akola news agriculture officer action