एटीएम फोडून आठ लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

बार्शीटाकळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

बार्शीटाकळी (अकोला): येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बायपासवर गुरुवारी (ता. 14) पहाटेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातून सुमारे ८ लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काल सायंकाळी एटीएममध्ये दहा लाख रुपये टाकले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. एटीएम फोडल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक राहुल धस, सहायक पोलिस निरीक्षक अशोक राणे, श्वानपथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, ठसे तज्ज्ञ, बार्शिटाकळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु आहे. गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात एटीएम फोडणारी टोळी सक्रीय झाली आहे. पातूर तालुक्यातील सस्ती येथील स्टेट बॅंकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. त्या चोरीतील आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले नसताना आता बार्शिटाकळी येथे एटीएम फोडून आठ लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या, दरोडे यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. कायदा सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे. चोरीच्या घटना कमी करण्याकरिता पोलिसाची रात्रीची गस्त असते. परंतु, जिल्ह्यात पोलिस विभागाची रात्रीची पेट्रोलींग कागदावर असल्याने चोराच्या पथ्थावर पडत आहे. पोलिस अधीक्षकांनी लक्ष देऊन जिल्ह्यातील कायदा व सुवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: akola news atm borken eight lakh theft