श्रावणी सोमवार : कावड मंडळांतील युवकांमध्ये हाणामारी

अनिल दंडी
सोमवार, 24 जुलै 2017

कावड घेऊन जाण्यार्‍या व्याळा व रिधोरा येथील मंडळाच्या सदस्यांमध्ये वाद झाला.

अकोला : बाळापूर तालुक्यातील रिधोरा व व्याळा येथील कावड मंडळांमध्ये हाणामारी होऊन रिधोरा येथील दोघेजण गंभीर झाले आहेत.

अकोल्यात दरवर्षी श्रावण महिन्याच्या सोमवारी वाघोली (गांधीग्राम) कावड घेऊन जाण्याची परंपरा आहे. आज पहाटे कावड घेऊन जाण्यार्‍या व्याळा व रिधोरा येथील मंडळाच्या सदस्यांमध्ये वाद झाला. ही घटना पाचमोरीजवळ घडली. व्याळा येथील युवकांनी रिधोरा कावड मंडळातील युवकांना रात्रीच्या अंधारात मारहाण केली.

त्यानंतर हे प्रकरण एवढ्या वरच थांबले नाही, तर व्याळा येथील युवक रिधोरा मार्गे परतीच्या प्रवासाला निघाले असतांना रिधोरा बस थांब्यावर त्यांना अडवून येथील युवकांनी पुन्हा मारहाण केली.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: akola news balapur shrawan kawad youths clash